India vs India : टीम इंडिया आमनेसामने भिडणार, एकूण 2 टी20 सामने खेळणार, संघ जाहीर, कुणाला संधी?
Team India : बीसीसीआयने त्रिकोणी टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेत टीम इंडिया विरुद्ध टीम इंडिया असे 2 सामने होणार आहेत. जाणून घ्या वेळापत्रक.
भारतात 3 डिसेंबरपासून वूमन्स अंडर 19 टीम इंडिया ए, वूमन्स अंडर 19 टीम इंडिया बी आणि वूमन्स दक्षिण आफ्रिका अंडर 19 यांच्यात त्रिकोणी टी20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने इंडिया ए आणि इंडिया बी दोन्ही टीमसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. बीसीसीआयने सोशल मीडिया अकाउंटवरुन बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकबाबत संपूर्ण जाणून घेऊयात.
या मालिकेत तिन्ही संघांमध्ये एकूण 10 दिवस 7 सामने होणार आहेत. या त्रिकोणी मालिकेचं आयोजन हे 3 ते 12 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या मालिकेतील संपूर्ण सामने हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहेत. मालिकेतील सलामीचा सामना हा मंगळवारी 3 डिसेंबर रोजी इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यात होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेनिमित्ताने टीम इंडिया ए विरुद्ध टीम इंडिया बी दोन्ही संघ एकूण 2 वेळा आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे वूमन्स टीम इंडिया ए आणि बी पैकी कोणती यंग ब्रिगेड सरस आहे? हे देखील स्पष्ट होईल.
त्रिकोणी मालिकेचं वेळापत्रक
- पहिला सामना, 3 डिसेंबर, इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- दुसरा सामना, 4 डिसेंबर, इंडिया बी विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- तिसरा सामना, 6 डिसेंबर, इंडिया ए विरुद्ध इंडिया बी
- चौथा सामना, 7 डिसेंबर, इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- पाचवा सामना,9 डिसेंबर, इंडिया बी विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- सहावा सामना, 10 डिसेंबर, इंडिया ए विरुद्ध इंडिया बी
- महाअंतिम सामना, 12 डिसेंबर
वूमन्स इंडिया अंडर 19 ए टीम : सानिका चाळके(कॅप्टन), जी त्रिषा (उपकर्णधार), जी काव्या श्री, भाविका अहिरे (विकेटकीपर), जोशिता वीजे, हर्ली गाला, षष्ठी मंडल, सिद्धी शर्मा, सोनम यादव, गायत्री सुरवसे, चांदनी शर्मा , हॅप्पी कुमारी, शबनम, बिदिशा डे आणि प्राप्ति रावल ( विकेटकीपर).
वूमन्स इंडिया अंडर 19 ए टीम : निकी प्रसाद (कर्णधार), कमलिनी जी ( उपकर्णधार आणि विकेटकीपर), महंती श्री, ईश्वरी अवासारे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, केसरी धृती, पारूनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा, पार्श्वी चोप्रा, नंधाना एस, अनाडी तागडे, अनंदिता किशोर, सुप्रिया अरेला आणि भारती उपाध्याय (विकेटकीपर).