दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यांना 12 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने दुसऱ्या फेरीसाठी सुदुसऱ्या फेरीसाठी संघ जाहीर, रिंकू सिंहला संधीधारित संघ जाहीर केले आहेत. बीसीसीआयकडून या संघांमध्ये बदल करण्यात आले आहेत. टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 19 सप्टेंबरपासून मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या फेरीसाठी बदल केले गेले आहेत. बीसीसीआयने बांगलादेश विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आता बीसीसीआयने कुणाला संधी दिलीय आणि कुणाला मुक्त केलंय? हे जाणून घेऊयात.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए, बी, सी आणि डी असे 4 संघ आहेत. बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी या 4 पैकी सी संघाचा अपवाद वगळता उर्वरित तिन्ही संघातील खेळाडूंची निवड केली आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या जागी नव्या खेळाडूंना संधी दिली आहे.
टीम इंडिया बांगलादेश विरूद्धच्या मालिकेसाठी 13 सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात करणार आहे. अशात टीम इंडियासाठी खेळणाऱ्या खेळाडूंना दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळता येणार नाही. शुबमन गिल दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इंडिया ए टीमचा कॅप्टन आहे. शुबमन गिल याची पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड केली गेली आहे. त्यामुळे शुबमनऐवजी मयंक अग्रवाल याच्याकडे इंडिया ए संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. शुबमन गिल याच्याजागी रेल्वेच्या प्रथम सिंह याची निवड करण्यात आली आहे. तर केएल राहुल याच्या जागी विदर्भाच्या अक्षय वाडेकर याचा समावेश केला गेला आहे. तर ध्रुव जुरेल याच्या जागी आंध्रप्रदेशच्या एसके रशीद याला इंडिया ए मध्ये संधी दिली गेली आहे. तर कुलदीप यादवच्या जागी मुंबईकर शम्स मुलानीला घेतलंय. तर आकाश दीप याच्या जागी आकिब खान खेळणार आहे.
इंडिया बी संघातून बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांची निवड केली गेली आहे. त्यामुळे यशस्वी आणि पंत या दोघांच्या जागी सुयश प्रभुदेसाई आणि रिंकू सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. तर यश दयालच्या जागी हिमांशु मंत्री याचा समावेश केला गेला आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी सुधारित संघ
🚨 News 🚨
Squads for second round of #DuleepTrophy 2024-25 announced.
Details 🔽 @IDFCFIRSTBank https://t.co/yzuivNlrmg
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 10, 2024
इंडिया डीमध्ये अक्षर पटेलऐवजी निशांत सिंधु याचा संधी दिली गेली आहे. तर तुषार देशपांडे दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला आहे. तुषारच्या जागी विदवथ कावेरप्पा याला संधी दिली गेली आहे.