IND vs BAN : बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?
India vs Bangladesh T20i Series: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 3 टी 20i सामन्यांच्या मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
टीम इंडिया मायदेशात कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळत आहे. यानंतर उभयसंघात 3 सामन्यांची टी 20I मालिका होणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी संघाची घोषणा करणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. निवड समितीने दोघांची पहिल्यांदा भारतीय संघात निवड केली आहे. एकाचं 3 वर्षांनंतर पुनरागमन झालं आहे. काही खेळाडूंना उल्लेखनीय कामगिरी करुनही संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेतील खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या आगमी कसोटी मालिकेमुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
दोघांची पहिल्यांदा निवड
मयंक यादव आणि नीतीश कुमार रेड्डी या दोघांची पहिल्यांदा भारतीय संघात निवड केली गेली आहे. लेग स्पिनर वरुण चक्रवर्ती याचं 3 पुनरागमन झालं आहे. चक्रवर्ती याने अखेरचा टी 20i सामना हा 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या तिघांना संधी मिळालेली नाही. विशेष करुन ऋतुराजला संधी न दिल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विकेटकीपर ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती दिली गेली आहे. हे खेळाडू सध्या बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेत खेळत आहेत.
टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
NEWS 🚨 – #TeamIndia’s squad for T20I series against Bangladesh announced.
More details here – https://t.co/7OJdTgkU5q #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DOyz5XGMs5
— BCCI (@BCCI) September 28, 2024
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 6 ऑक्टोबर, ग्वाल्हेर
दुसरा सामना, 9 ऑक्टोबर, नवी दिल्ली
तिसरा सामना, 12 ऑक्टोबर, हैदराबाद
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.