बीसीसीआय निवड समितीने आगामी इमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडिया ए संघाची घोषणा केली आहे. तिलक वर्मा हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच अनेक युवा खेळाडूंना या स्पर्धेत संधी देण्यात आली आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन हे 18 ते 28 ऑक्टोबर दरम्यान ओमान येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत टीम इंडियासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगालदेश आणि अफगाणिस्तान सहभाग घेणार आहेत.
एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्मा याची ही यंदाची दुसरी वेळ असणार आहे. अभिषेक गेल्या वर्षी 2023च्या एमर्जिंग आशिया कप स्पर्धेतही खेळला होता. तसेच साई सुदर्शन आणि हर्षित राणा या दोघांनाही संधी देण्यात आली आहे. यश धुल याने गेल्या स्पर्धेत भारताचं नेतृत्व केलं होतं. मात्र भारताला अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत व्हावं लागलं होतं.
निवड समितीने यंदा युवा खेळाडूंना संधी दिलीय. यामध्ये आयुष बदोनी, अनुज रावत, रमनदीप सिंह, नेहल वढेरा, आकिब खान आणि वैभव अरोरा यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच अभिषेक शर्मा याच्याकडून या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा असणार आहे. अभिषेक नुकत्याच बांगलादेश विरुद्ध पार पडलेल्या टी 20i मालिकेत खेळला आहे. अभिषेकला या मालिकेत फार काही करता आलं नाही. त्यामुळे आता अभिषेककडे आपली छाप सोडण्याची संधी आहे.
आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
The squad list is out for India A, led by Tilak Varma as the captain! 🇮🇳#ACC #MensT20EmergingTeamsAsiaCup pic.twitter.com/XAWOm4DDM5
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 12, 2024
भारत विरुद्ध पाकिस्तान, 19 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ओमान, 21 ऑक्टोबर
भारत विरुद्ध यूएई, 23 ऑक्टोबर
सेमी फायनल, 25 ऑक्टोबर
फायनल, 27 ऑक्टोबर
एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघ : तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह, आयुष बदोनी, निशांत सिंधु, रमनदीप सिंह, अनुज रावत, नेहल वढेरा, अंशुल कंबोज, रितिक शौकीन, वैभव अरोरा, रसिख सलाम , साई किशोर, राहुल चाहर आणि आकिब खान.