न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे-टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
बीसीसीआयने न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली याला डच्चू देण्यात आला आहे. युवांना संधी मिळाली आहे.
मुंबई : न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला याच महिन्यात म्हणजेच 18 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 27 जानेवारीपासून टी 20 मालिका सुरु होणार आहे. तर यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे यापैकी पहिल्या 2 सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतही विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश करण्यात आलेला नाही. तर मुंबईकर पृथ्वी शॉची एन्ट्री झाली आहे. तर कसोटी मालिकेत सूर्यकुमार यादवला संधी मिळाली आहे.
रोहित-हार्दिक कॅप्टन
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. तर टी 20 मालिकेत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली आहेत.
पृथ्वी शॉचं पुनरागमन
रणजी ट्रॉफीत त्रिशतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉची अखेर निवड समितीला दखल घ्यावी लागली आहे. पृथ्वीची टी 20 मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. पृथ्वी गेल्या वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून टीम इंडियापासून दूर होता. त्यामुळे निवड समितीवर सडकून टीका केली जात होती. मात्र आता पृथ्वीच्या कामगिरीची दखल घेत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा भारत दौरा
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद
दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर
तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली मॅच, 27 जानेवारी, रांची
दुसरी मॅच, 29 जानेवारी, लखनऊ
तिसरी मॅच, 1 फेब्रुवारी, हैदराबाद
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
वनडे आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ
India’s squad for NZ T20Is: Hardik Pandya (C), Suryakumar Yadav (vc), Ishan Kishan (wk), R Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Rahul Tripathi, Jitesh Sharma (wk), Washington Sundar, Kuldeep Yadav, Y Chahal, Arshdeep Singh, Umran Malik, Shivam Mavi, Prithvi Shaw, Mukesh Kumar
— BCCI (@BCCI) January 13, 2023
टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.