Ireland vs India | आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूला कॅप्टन्सीची लॉटरी

Irealand vs Team india t20i series : टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे.

Ireland vs India | आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूला कॅप्टन्सीची लॉटरी
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 8:52 PM

मुंबई | टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या टी 20 मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

जसप्रीत बुमराह याच्याकडे कॅप्टन्सी

बीसीसीआयने जसप्रीत बुमराह याला 3 सामन्यांच्या मालिकेसाठी कर्णधारपद दिलं आहे. या मालिकेतून बुमराहने अखेर एन्ट्री केली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याला प्रमोशन देण्यात आलंय. ऋतुराज गायकवाड याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

जसप्रीत बुमराह याचं कमबॅक

टीम इंडियाला आयर्लंड दौऱ्यानिमित्ताने अतिशय गोड बातमी मिळाली आहे. बुमराहने पाठीच्या दुखापतीनंतर तब्बल 10 महिन्यांनी टीममध्ये कमबॅक केलंय. बुमराहने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा 25 सप्टेंबर 2022 रोजी खेळला होता. तेव्हापासून बुमराहला दुखापतीमुळे आशिया कप, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्धच्या मालिकांना मुकावं लागलं होतं. तसेच आयपीएल 16 व्या मोसमातही बुमराहला सहभागी होता आलं नव्हतं. मात्र आता बुमराह पूर्णपणे फीट झालाय. त्यासह बुमराहने एन्ट्रीही केली.

वरिष्ठांना आराम युवांना संधी

दरम्यान बीसीसीआयने या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह याला संधी दिली गेली आहे. तसेच दुखापतीनंतर बुमराहसह प्रसिद्ध कृष्णा याचं पुनरागमन झालंय. र शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाद अहमद, आवेश खान यांचा अनेक महिन्यांनी समावेश करण्यात आला आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (व्हीसी), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.

टीम इंडियात जसप्रीत बुमराह याची एन्ट्री

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेचं वेळापत्रक

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.