Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Team India | वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला संधी?

team india icc world cup squad 2023 | बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाहा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळण्याची संधी कुणाला मिळाली आणि कुणाला नाही?

World Cup 2023 Team India | वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला संधी?
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 4:57 PM

मुंबई | बीसीसीआय निवड समितीने आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. रोहित शर्मा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया श्रीलंकेत आशिया कप 2023 स्पर्धा खेळत आहे. श्रीलंकेत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगरकर आणि रोहित या दोघांची पत्रकार परिषद पार पडली. आगरकर यांनी या पत्रकार परिषदेत वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

बीसीसीआय निवड समितीने आशिया कपच्या 17 खेळाडूंमधून वर्ल्ड कपसाठी 15 जणांची निवड केली आहे. प्रसिध कृष्णा आणि तिलक वर्मा या दोघांना डच्चू देण्यात आला आहे. तर संजू सॅमसन याचा आशिया कप 2023 मध्ये टीम इंडियात राखीव विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला होता.  मात्र प्रसिध कृष्णा आणि तिलक वर्मा या दोघांना वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

वर्ल्ड कपसाठी कुणाकडे कोणती जबाबादारी?

वर्ल्ड कपसाठी 5 बॅट्समन, 2 विकेटकीपर बॅट्समन, 4 ऑलराउंडर, 1 रिस्ट स्पिनर आणि 3 फास्ट बॉलर अशी सर्वसमावेशक टीम इंडिया आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्याकडे ओपनिंगची जबाबदारी असणार आहे. विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव या तिघांवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल. ईशान किशन आणि केएल राहुल हे विकेटकीपर बॅट्समन आहेत. वर्ल्ड कपसाठी कुणाला संधी मिळाली आहे हे आपण पाहुयात.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

तर हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या 4 ऑलरांउडर्सवर बॉलिंग आणि बॅटिंग अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांकडे वेगवान बॉलिंगची धुरा देण्यात आलीय. तर चायनामॅन कुलदीप याच्यावर फिरकीची जबाबदारी आहे.

अश्विन, धवन आणि चहलला डच्चू

बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी अनुभवी फिरकीपटू आर अश्विन, ओपनर शिखर धवन आणि कुलचा जोडीतील ‘चा’ म्हणजे युझवेंद्र चहल या तिघांचा विचार केलेला नाही. वर्ल्ड कपसाठी कुणालाही दारं बंद नाहीत, असं कॅप्टन रोहितने आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करताना पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. मात्र त्यानंतरही निवड समितीने या तिघांपैकी एकाचाही विचार केलेला नाही.

वर्ल्ड कप 2023 आणि टीम इंडिया

वर्ल्ड कप 2023 चं भारतात आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक टीम इतर 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळेल. एकूण 10 ठिकाणी 45 दिवसात 48 सामने पार पडणार आहेत. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईत पार पडणार आहे.

तर टीम इंडिया वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळणार आहे. टीम इंडियासमोर रविवारी 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँडचं आव्हान असेल, तो सामना बंगळुरुत पार पडणार आहे. तर त्यानंतर 15 आणि 16 नोव्हेंबरला पहिला आणि दुसरा सेमी फायनल सामना होईल. तर 17 नोव्हेंबरला महाअंतिम सामना होईल.

आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) ,  शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?.
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'.
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?.
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे.
मुंबईकरांनो.. उद्या लोकलने प्रवास करणार आहात? बघा कसा असणार मेगाब्लॉक?
मुंबईकरांनो.. उद्या लोकलने प्रवास करणार आहात? बघा कसा असणार मेगाब्लॉक?.
ट्रम्प मोदींना म्हणाले...मिस यू! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच दौरा
ट्रम्प मोदींना म्हणाले...मिस यू! राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच दौरा.
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?
भिकारी 1 रूपया घेत नाही पण सरकार..., कृषीमंत्री भिकारी कोणाला म्हणाले?.
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?
आधी हल्लाबोल आता धनंजय मुंडेंचीच घेतली भेट,सुरेश धसांची गुप्त सेटिंग?.
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान
दादा पवार मुंडेंच्या पाठिशी, तूर्तास मंत्रिपद शाबूत, कोअर कमिटीत स्थान.