IND vs PAK : आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडणार
India vs Pakistan : क्रिकेट चाहत्यांना पु्न्हा एकदा टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याच थरार अनुभवता येणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. जाणून घ्या.
अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाला अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. गतविजेत्या बांगलादेशने टीम इंडियाला या अंतिम सामन्यात पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरलं. टीम इंडियाने अमान खान याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याने स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात केली होती. टीम इंडियाला पाकिस्तानने या सामन्यात पराभूत केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा काही दिवसांनी इंडिया विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने गुरुवारी 12 डिसेंबर रोजी अंडर 19 वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. निवड समितीने मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच राखीव खेळाडूंनाही स्थान देण्यात आलं आहे. निकी प्रसाद भारताचं नेतृत्व करणार आहे. तर सानिका चाळके हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. या स्पर्धेचा थरार 15 डिसेंबरपासून रंगणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे मलेशियातील क्वालालांपूर शहरातील बेयूमास क्रिकेट ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहेत.
6 संघ, 2 गट आणि 1 ट्रॉफी
या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या संघांना 3-3 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहेत. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि यजमान मलेशियाचा समावेश आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. इंडिया-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रविवारी 15 डिसेंबरला होणार आहे.तर 17 तारखेला टीम इंडिया विरुद्ध नेपाळ अशी लढत होणार आहे. तर 22 डिसेंबरला अंतिम सामना होणार आहे.
वूमन्स अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक
🚨 NEWS
India U19 squad for inaugural ACC Women’s U19 Asia Cup announced.
More Details 🔽 #WomensU19AsiaCup | #ACChttps://t.co/b9h5bAzpA5
— BCCI Women (@BCCIWomen) December 12, 2024
अंडर19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसारे, मिथिला विनोद, जोशीता वीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रीथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि नंदना एस.
राखीव: हर्ले गाला, हॅप्पी कुमारी, जी काव्या श्री आणि गायत्री सुरवसे.
नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : प्राप्ती रावल.