2 संघ, 3 मालिका आणि 9 सामने, टीम इंडिया विंडिज आणि आयर्लंडविरुद्ध भिडणार, पाहा वेळापत्रक

Indian Women Cricket Team : टीम इंडिया डिसेंबर आणि जानेवारी 2025 मध्ये मायदेशात वूमन्स विंडिज आणि आयर्लंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

2 संघ, 3 मालिका आणि 9 सामने, टीम इंडिया विंडिज आणि आयर्लंडविरुद्ध भिडणार, पाहा वेळापत्रक
wankhede stadium mumbaiImage Credit source: Bcci
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 12:08 PM

टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप फायनलच्या दृष्टीकोनातूनही मालिका फार महत्त्वाची आहे. भारताला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचायचं असेल, तर ही मालिका 4-1 ने जिंकावी लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियात तयारीला लागले आहेत. तर दुसर्‍या बाजूला टीम इंडिया विंडिज आणि आयर्लंडविरुद्ध टी 20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

विंडिज वूमन्स आणि आयर्लंड वूमन्स क्रिकेट टीम अनुक्रमे डिसेंबर आणि जानेवारी 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत. बीसीसीआय वूमन्सने बुधवारी 13 नोव्हेंबरला या दोन्ही संघांविरूद्धच्या मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं. वूमन्स टीम इंडिया मायदेशात विंडिज विरुद्ध टी 20I आणि वनडे सीरिजमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. उभसंघातील टी 20I मालिकेचं आयोजन हे 15 ते 19 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. हे तिन्ही सामने नवी मुंबईत पार पडणार आहेत. तर त्यानंतर 22 ते 27 डिसेंबर दरम्यान बडोद्यात तिन्ही एकदिवसीय सामने होणार आहेत.

आयर्लंडचा भारत दौरा

त्यानंतर वूमन्स टीम इंडिया नववर्षात आयर्लंड विरुद्ध मायदेशातील पहिली एकदिवसीय मालिका खेळणार आहे.या मालिकेतही 3 सामने होणार आहेत. 10 ते 15 जानेवारी दरम्यान हे सामने होणार आहेत. तिन्ही सामने राजकोट येथे होणार आहेत.

वूमन्स इंडियाचं मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर

विडिंजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

टी 20I मालिका

पहिला सामना, 15 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई

दुसरा सामना, 17 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई

तिसरा सामना, 19 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई

एकदिवसीय मालिका

पहिला सामना, 22 डिसेंबर, दुपारी दीड वाजता, बडोदा

दुसरा सामना, 24 डिसेंबर, दुपारी दीड वाजता, बडोदा

तिसरा सामना, 27 डिसेंबर, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी, बडोदा

आयर्लंडचा भारत दौरा, टी 20I मालिका

पहिला सामना, 10 जानेवारी, सकाळी 11 वाजता, राजकोट

दुसरा सामना, 12 जानेवारी, सकाळी 11 वाजता, राजकोट

तिसरा सामना, 15 जानेवारी, सकाळी 11 वाजता, राजकोट

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.