टी 20I वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, मुंबईकर खेळाडूकडे मोठी जबाबदारी

India Squad For ICC Under 19 Women T20 World Cup 2025 : पहिल्याच स्पर्धेत दणक्यात आशिया कपवर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाची महिला ब्रिगेड आता वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे.

टी 20I वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, मुंबईकर खेळाडूकडे मोठी जबाबदारी
bcciImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 2:55 PM

भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी अंडर 19 वूमन्स टी 20I वर्ल्ड कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समितीने मुख्य संघात 15 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर 3 खेळाडूंना राखीव म्हणून संधी देण्यात आली आहे. निकी प्रसाद भारतीय अंडर 19 महिला संघाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर सानिका चाळके हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. वूमन्स टीम इंडियाने रविवारी 22 डिसेंबरला बांगलादेशचा धुव्वा उडवत पहिल्यावहिल्या अंडर 19 आशिया कपवर नाव कोरलं. त्यामुळे आता या महिला ब्रिगेडकडून आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

स्पर्धेबाबत थोडक्यात पण महत्त्वाचं

या वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडियासह विंडीज, यजमान मलेशिया आणि श्रीलंका हे 4 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 19 जानेवारीला विंडीजविरूद्धच्या सामन्याने करणार आहे. त्यानंतर 21 जानेवारीला मलेशियाविरुद्ध सामना होईल. तर टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना हा 23 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळेल.

स्पर्धेचे नियम

प्रत्येक गटातील पहिले 3 संघ सुपर 6 सिक्ससाठी पात्र ठरतील. सुपर 6 फेरीतील सामन्यांचं आयोजन हे 25 ते 29 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. सुपर 6 फेरीसाठी 6-6 नुसार 2 गट असतील. सुपर 6 मधून दोन्ही गटातून अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील सामने हे 31 जानेवारीला होतील. तर 2 फेब्रुवारीला विश्व विजेता संघ निश्चित होईल.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

  1. इंडिया विरुद्ध विंडीज, 19 जानेवारी, मलेशिया
  2. इंडिया विरुद्ध मलेशिया, 21 जानेवारी, मलेशिया,
  3. इंडिया विरुद्ध श्रीलंका, 23 जानेवारी, मलेशिया

वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ

वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसरे, मिथिला विनोद, जोशिता व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी धृती, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि वैष्णवी एस.

स्टँडबाय खेळाडू : नंदना एस, इरा जे आणि अनादी टी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.