Bcci Announced Squad Against Australia : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयकडून टीम इंडियाची घोषणा, स्टार खेळाडूंची एन्ट्री
बीसीसीआयने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. तीन सामन्यांची टी-20 आणि वन डे मालिका पार पडणार आहे. दोन स्टार खेळाडूंची वन डे संघात वर्णी लागली आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यामधील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे सीनिअर खेळाडू वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पहिल्यांदा मैदानात उतरलेले दिसतील. टीम इंडियाला आतापर्यंत आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही, त्यासाठी रोहितसेना सज्ज आहे. अशातच बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तीन सामन्यांची वन डे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स ऑस्ट्रेलियामधील वन डे मालिक 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 28, 30 डिसेंबर आणि 2 जानेवारीला वन डे सामने होणार आहेत. त्यानंतर 5, 7 आणि 9 डिसेंबरला तीन टी- 20 सामन्यांची मालिका सुरू असणार आहे. श्रेयंक पाटील आणि सायका इशाक यांची वन डे संघात निवड झाली आहे. आगामी मालिकेमध्ये त्या पदार्पण करू शकतात. हरलीन देओल आणि स्नेह राणा यांनी वन ड संघात स्थान मिळालं आहे.
🚨 NEWS 🚨#TeamIndia’s ODI & T20I squad against Australia announced.
Details 🔽 #INDvAUS | @IDFCFIRSTBankhttps://t.co/7ZsqUFR9cf
— BCCI Women (@BCCIWomen) December 25, 2023
दरम्यान, टीम इंडियाने नुकताच ऑस्ट्रेलियाचा एकमेव कसोटी सामन्यामध्ये पराभव करत इतिहास रचला आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत पहिल्यांदाच कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या विजयाची नोंद केली.
वन डे संघ : हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना (VC, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीप), रिचा घोष (WK), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, हरलीन देओल
टी-20 संघ: हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना (VC), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), रिचा घोष (WK), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, मिन्नू मणी