BCCI | बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, कुणाला लॉटरी, कुणाला झटका?

बीसीसीआयकडून टीम इंडियाच्या खेळाडूंचं वार्षिक करार जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या वार्षिक करारातून टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूला आनंदाची बातमी मिळाली आहे.

BCCI | बीसीसीआयकडून वार्षिक करार जाहीर, कुणाला लॉटरी, कुणाला झटका?
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 1:24 AM

मुंबई | क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. एका बाजूला वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर 7 विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबईने या विजयासह वूमन्स आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी 2022-23 या वर्षासाठीचं वार्षिक करार जाहीर केला आहे. हा वार्षिक करार ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी आहे.  बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयकडून वार्षिक कराराची घोषणा

बीसीसीआय दरवर्षी वार्षिक करार जाहीर करते. या करारात A+, A, B आणि C अशा एकूण 4 श्रेणी असतात. बीसीसीआय खेळाडूच्या कामगिरीचं मूल्यमापन करुन संबंधित खेळाडूचा योग्यतेनुसार त्या त्या गटात श्रेणीत समावेश केला जातो. तसेच श्रेणीनुसार वार्षिक वेतन ठरतं.

टीम इंडियाच्या खेळाडूंचं वेतन

बीसीसीआय A+ श्रेणीतील खेळाडूला 7 कोटी, A+ श्रेणीतील खेळाडूला 5 कोटी, B श्रेणीतील खेळाडूला 3 आणि C श्रेणीतील खेळाडूला 1 कोटी देतं. यंदाही या क्रमानेचस ही रक्कम ठरवण्यात आली आहे. ही वार्षिक पगारवाढ ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. थोडक्यात काय तर टीम इंडियाच्या खेळाडूंना ही वाढ ऑक्टोबर 2022 लागू होणार आहे.

श्रेणीनिहाय खेळाडू

बीसीसीआयच्या A+ प्लस श्रेणीत आधी 3 खेळाडू होते, त्यात आता एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याचा समावेश A+ प्लस श्रेणीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता या श्रेणीत कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा असे 4 खेळाडू आहेत.

तसेच A श्रेणीत हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हे खेळाडू आहेत. तर बी कॅटेगरीत चेतेश्वर पुजारा, केएल राहुल श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यांचा समावेश आहे.

तर C श्रेणीत सर्वाधिक 11 खेळाडू आहेत. यात उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह आणि केएस भरत यांचा समावेश आहे.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....