IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीसाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, जसप्रीत बुमराह आऊट

IND vs ENG 4th Test Squad : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथ्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. जसप्रीत बुमराह बाहेर झाला आहे. तर एका स्टार बॉलरने कमबॅक केलं आहे. या बॉलरने रणजी सामन्यात दहा विकेट घेतल्या होत्या असा तो बॉलर असून कोण आहे जाणून घ्या.

IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीसाठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा, जसप्रीत बुमराह आऊट
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 3:00 PM

मुंबई : इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने टीमची घोषणा केली आहे. टीम इंडियासाठी मोठा धक्का म्हणजे स्टार बॉलर जसप्रीत बुमराह याल विश्रांती देण्यात आली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या 23 फेब्रुवारीला होणार आहे. टीमसाठी आणखी एक वाईट बातमी म्हणजे के. एल. राहुल अजुनही दुखापतीमधून सावरला नसल्याने तो चौथ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे.

हा खेळाडू संघात परतला

टीम इंडियाचा युवा खेळाडू मुकेश कुमार हा संघात परतला आहे. तिसऱ्या सामन्यामधील प्लेइंग 11 मध्ये नसल्याने त्याला रणजी सामना खेळण्यासाठी सोडण्यात आलं होतं. बंगाल आणि बिहारमधील सामन्यात पठ्ठ्याने दहा विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे जसप्रीत बुमराह याच्या जागी मुकेश कुमार प्लेइंग 11 मध्ये खेळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाकडे आघाडी

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील  पाच सामन्यांच्या मालिकेत रोहितसेनेने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ने आघाडी घेतली आहे. जर चौथा सामनाही टीम इंडियाने जिंकला तर मालिका टीम इंडिया खिशात घालणार आहे. या कसोटी सामन्यात संघामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. बुमराह याच्या जागी मुकेश कुमार की आकाश दीप याला संधी मिळते याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

चौथा कसोटी सामना केव्हा आणि कुठे?

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान असणार आहे. हा सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे.

चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया:-

रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.