BCCI : रिटायर झालेल्या खेळाडूंना IPL खेळता नाही येणार? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

बीसीसीआय नवा नियम आणून परदेशी लीग खेळणाऱ्या खेळाडूंना कुलिंग ऑफ पीरियडचा नियम लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BCCI : रिटायर झालेल्या खेळाडूंना IPL खेळता नाही येणार? बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 7:40 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले खेळाडू वेगवेगळ्या लीगमध्ये खेळताना दिसतात. आतासुद्धा असे अनेक खेळाडू आहेत जे निवृत्ती घेतल्यावर लीगमध्ये खेळत आहेत. मात्र आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. (BCCI May Introduce Cooling Off Period For Retired IPL Stars) निवृत्त झालेले खेळाडू परदेशी लीगमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे बीसीसीआय यावर ठोस असा निर्णय घेणार आहे. बीसीसीआय नवा नियम आणून परदेशी लीग खेळणाऱ्या खेळाडूंना कुलिंग ऑफ पीरियडचा नियम लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीसीसीआयची 7 जुलैला सर्वोच्च परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत निवृत्त खेळाडूंच्या नियमांचा मुद्दा उपस्थित होणार आहे. याशिवाय सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत प्रभावशाली खेळाडूंच्या नियमावरही चर्चा होणार आहे. आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अलीमध्ये खेळाडूंसाठी नियम वेगळे आहेत.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले भारतीय खेळाडू नुकतेच UAE च्या आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये खेळताना दिसले. परदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी सध्या कोणतेही धोरण नाही. त्यामुळे बीसीसीआयला नवीन धोरण आणण्याच्या तयारीत आहे.

असा असू शकतो नवीन नियम?

बीसीसीआय नवीन कुलिंग ऑफ पीरियड नियम लागू करू शकतं. ज्यामध्ये निवृत्तीनंतर खेळाडू काही महिने किंवा वर्षांनीच परदेशी लीगमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यासोबतच त्यांना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागू शकते. जर हा नियम मोडला खेळाडूंवर बीसीसीआय कारवाई करू शकतं. निवृत्तीनंतर खेळाडू अनेकदा प्रशिक्षक, गोलंदाजी-क्षेत्ररक्षण-फलंदाजी प्रशिक्षक अशा भूमिकांमध्ये ज्यांना पगार बीसीसीआय देतं. नियम मोडणाऱ्या खेळांडूना या पदावर घेतलं जावू शकत नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.