BCCI | 87 वर्षांची परंपरा खंडित, रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय
1934 मध्ये पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचं (Ranji Trophy) आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबई : बीसीसीआयने (BCCI) देशांतर्गत सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी करंडक स्पर्धा (Ranji TRophy) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह (Bcci Jay Shah) यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. शाह यांनी पत्राच्या माध्यमातून देशातील विविध राज्यातील संघटनांना याबाबतची कल्पना दिली आहे. ही स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयामुळे गेल्या 87 वर्षांपासूनची परंपरा खंडित झाली आहे. तसेच या निर्णयाचा अनेक खेळाडूंना आर्थिक फटका बसू नये म्हणून बीसीसीआयने नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेतला आहे. रणजीच्या पहिल्या मोसमाचं आयोजन 1934 मध्ये करण्यात आलं होतं. बीसीसीआय यंदा रणजी ट्रॉफी ऐवजी विजय हजारे ट्राफी (Vijay Hajare Trophy) आणि सीनियर महिला वनडे स्पर्धेचं आयोजन करण्याच निर्णय घेतला आहे. (bcci canceled Ranji Trophy first time after 87 years)
खेळाडूंना नुकसान भरपाई
रणजीच्या सामन्यातून देशांतर्गत सामने खेळणाऱ्या खेळाडूंना एका सामन्याते जवळपास 1 लाख 80 हजार मिळतात. मात्र ही स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे खेळाडूंना आर्थिक फटका बसू नये म्हणून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं जय शाह म्हणाले.
देशातील 6 शहरात स्पर्धेचं आयोजन
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर विजय हजारे करंडकाचे आयोजन 6 शहरांमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान त्या 6 शहरांच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ही स्पर्धा एकूण महिनाभर चालणार आहे. यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व संघ हे फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्यात बायो बबल वातावरणात प्रवेश करतील. या स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
…म्हणून निर्णय घेण्यात आला
काही महिन्यानंतर आयपीएलच्या 14 वा (IPL 2021) मोसम खेळण्यात येणार आहे. यामुळे सर्व खेळाडूंना आपल्या संघासाठी उपलब्ध व्हावे लागणार आहे. यामुळे विजय हजारे ट्रॉफी की रणजी करंडक या 2 स्पर्धेपैकी कोणत्या स्पर्धेचं आयोजन करायचं, याबाबत बीसीसीआयला निर्णय घेता येत नव्हता. यामुळे बीसीसआयने सर्व राज्य संघटनांकडे याबाबत चर्चा केली. यानंतर एकमताने रणजीऐवजी विजय हजारे स्पर्धेला प्राथमिकता देण्यात आली. यामुळे रणजी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. रणजी सामना हा एकूण 4 दिवस खेळण्यात येतो. तर विजय हजारे स्पर्धेतील सामना हा एकदिवसीय असतो.
तामिळनाडू विरुद्ध बडोदा आमनेसामने
दरम्यान सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेती अंतिम सामना 31 जानेवारीला रंगणार आहे. हा सामना तामिळनाडू विरुद्ध बडौदा यांच्यात खेळण्यात येणार आहे. यामुळे विजेतेपद कोणता संघ जिंकणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूचं शुभमंगल सावधान!
Special Story | टीम इंडिया की इंग्लंड, कसोटी मालिकेत वरचढ कोण? पाहा आकडेवारी
(bcci canceled Ranji Trophy first time after 87 years)