मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला आता मोजून 20 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. टीम इंडिया आशिया कप फायनलनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या वनडे सीरिजसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. ही वनडे मालिका टीम इंडियासाठी वर्ल्ड कपची रंगीत तालीमच असणार आहे. त्यामुळे या टीममध्ये वर्ल्ड कपमधील खेळाडूंचीच निवड करण्यात येणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
टीम इंडियात वर्ल्ड कपआधी अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू बाहेर पडला आहे. तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. एकाएकी वर्ल्ड कपआधी टीम इंडियात झालेल्या बदलामुळे क्रिकेट चाहतेही शॉक आहेत. भारतीय नियमाक क्रिकेट मंडळ अर्थात बीसीसीआयने याबाबत सोशल मीडिया पोस्ट करत ही माहिती क्रिकेट चाहत्यांना दिली आहे. बीसीसीआयने या बदलाबाबत ट्विट केलंय.
चीनमधील हांगझोऊ इथे अवघ्या काही दिवसांनी एशियन गेम्स स्पर्धा 2023 ला सुरुवात होणार आहे. त्याआधी वूमन्स आणि मेन्स क्रिकेट टीम इंडियात बदल करण्यात आले आहेत. दुखापतीमुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. मेन्स टीममध्ये आकाश दीप याची एन्ट्री झाली आहे. तर याआधी महिला टीममध्ये राखीव असेलल्या पूजा वस्त्राकर हीचा मुख्य संघात समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियात बदल
🚨 UPDATE 🚨: 19th Asian Games Hangzhou 2022 – #TeamIndia (Men’s and Women’s) Squad Updates. #AsianGames
All The Details ⬇️ https://t.co/iHimyKMa83
— BCCI (@BCCI) September 16, 2023
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शिवम मावी बॅक इंजरीमुळे एशियन गेम्समधून बाहेर झाला आहे. मावीच्या जागी आकाश दीप याला संधी दिली आहे. एशियन गेम्समध्ये मेन्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हे 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. पुणेकर ऋतुराज गायकवाड या टीमचं नेतृत्व करणार आहे. तर महिला टीम इंडियाच्या नेतृत्वाची सूत्रं ही हरमनप्रीत कौर हीच्याकडे आहेत.
टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाश दीप, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.