Team India Selection: बीसीसीआयने वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत या खेळाडूंच केलंय सिलेक्शन, पाहा कोण आहेत ते खेळाडू!

Team India Selection : आयसीसी स्पर्धेत सतत पराभवाचं तोंड पाहणाऱ्या टीम इंडियाची पुन्हा एकदा नव्याने बांधणी सुरु झाली आहे. वनडे वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप डोळ्यासमोर ठेवूनच वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी खेळाडूंची निवड केल्याचं दिसत आहे.

Team India Selection: बीसीसीआयने वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत या खेळाडूंच केलंय सिलेक्शन, पाहा कोण आहेत ते खेळाडू!
वेस्ट इंडिज दौरा की भविष्याचा विचार! कशी केली टीम इंडियाची निवड, जाणून घ्या पाच पॉईंट्सImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 4:53 PM

मुंबई : भारत क्रिकेटप्रेमी देश आहे. क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असंच म्हंटलं जातं. पण याच क्रिकेटवेड्या देशात आयसीसी चषकाचा गेल्या दहा वर्षात दुष्काळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वच स्तरातून टीम इंडियातील खेळाडू आणि बीसीसीआयवर टीका होत आहे. भविष्याचा विचार करून आता बीसीसीआयने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. टी20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गमवल्यानंतर टीम इंडियाची नव्याने बांधणी केली जात असल्याचं दिसत आहे. वेस्ट दौऱ्यानिमित्त काही खेळाडूंना संधी, तर काही खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात टीम कशी असेल याचा अंदाज येत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट आणि वनडे संघाची घोषणा केली आहे.

भारताचा वेस्ट इंडिज दौरा

भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात म्हणजेच 12 जुलै 2023 पासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खेळाडूंची निवड खूपच महत्त्वाची आहे. यामध्ये नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे, वनडे वर्ल्डकपनंतर यात काही बदल होतील हे निश्चित आहे.

काय आहेत बदल वाचा

  • कसोटी संघात चेतेश्वर पुजारा याच्याकडे दिग्गज फलंदाज म्हणून पाहिलं गेलं आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यात त्याचं वय पाहता भविष्याच्या दृष्टीने टेस्ट संघात बसणं कठीण आहे. चेतेश्वर पुजारा 35 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याचं संघात पुनरागमन होणं आता कठीणच आहे.
  • कसोटी संघात अनुभवी खेळाडूंची आवश्यकता असते. त्यामुळे अजिंक्य रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साठी मदत होईल असा दृष्टीकोन ठेवला गेला आहे. अजिंक्य रहाणेला उपकर्णधारपद सोपवलं गेलं आहे. दुसरीकडे, भविष्यात रोहित शर्मानंतर त्याला कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं.
  • नव्या दम्याच्या खेळाडूंच्या दृष्टीने ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेत या खेळाडूंकडून खूप अपेक्षा असणार आहेत. तर ऋतुराजला वनडे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे.
  • वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. यासाठी वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय संघात संजू सॅमसन स्थान दिलं आहे. दुसरीकडे, कसोटीत उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे. उमेश यादवचं संघात पुनरागमन होणं तसं कठीणच आहे. सैनीने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.
  • वनडे संघात डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी मिळाली आहे. उनाडकटने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना 2013 मध्ये खेळला होता. बुमराह दुखापतग्रस्त असल्याने ही जागा भरून काढण्याचा प्रयत्न आहे.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.