रोहित शर्माचा आक्षेप आणि आयपीएलच्या 18 व्या मोसमात मोठा बदल? बीसीसीआय एक्शन मोडमध्ये!

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या स्पर्धेसाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायसी यांच्यात 31 जुलैला महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आयपीएलबाबत एक मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मासह अनेक खेळाडूंनी घेतलेल्या आक्षेपावर अखेर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माचा आक्षेप आणि आयपीएलच्या 18 व्या मोसमात मोठा बदल? बीसीसीआय एक्शन मोडमध्ये!
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 5:31 PM

आयपीएल 2025 स्पर्धेचे वेध आतापासूनच सुरु झाले. ही स्पर्धा पुढच्या वर्षी होणार असल्याने आतापासून तयारी सुरु झाली आहे. कारण या स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. दर तीन वर्षांनी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होतो. त्यामुळे यावेळी कोणते खेळाडू रिलीज केले जाणार आणि कोणाला संघात घेतलं जाणार याची उत्सुकता वाढली आहे. आयपीएल फ्रेंचायसींनी बीसीसीआयला आधीच स्पर्धेतील लिलावापूर्वी काही सूचना दिल्या आहेत. आता बीसीसीआय 31 जुलैला वानखेडे स्टेडियम परिसरातील बीसीसीआय कार्यालयात बैठक घेणार आहे. या बैठकीत आयपीएल मेगा लिलावासंदर्भात चर्चा होणार आहे. तसेच काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे. आयपीएलमध्ये मागच्या दोन वर्षांपासून असलेला एक नियम चर्चेत आहे. नियम दुसरा तिसरा काही नसून इम्पॅक्ट प्लेयर हा आहे. या नियमामुळे टी20 क्रिकेटचे ठोकताळेच बदलले आहे. तसेच गोलंदाजांची धाकधूक वाढली आहे. अशा स्थितीत गोलंदाजांचं करिअरच पणाला लागलं आहे. कारण डेथ ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाज येऊन पिसं काढून जाताना दिसत आहे. तसेच पॉवर प्लेमध्ये विकेट पडली तरी टेन्शन नसायचं.

मागच्या पर्वात या नियमावर काही खेळाडूंनी आक्षेप घेतला होता. रिपोर्टनुसार, काही खेळाडू आणि कोचिंग स्टाफमधील सदस्य या नियमाविरुद्ध आहेत. रोहित शर्मा डेविड मिलर सारखे दिग्गज खेळाडू या नियमाविरुद्ध आहेत. तज्ज्ञांच्या मते, इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. पण ब्रॉडकास्टर हा नियम कायम ठेवण्याच्या बाजूने आहेत. दरम्यान, इम्पॅक्ट प्लेयर हा नियम फक्त भारतीय क्रिकेटमध्ये आहे. हा नियम आयपीएल 2023 मध्ये लागू केला होता. दोन पर्वात या नियमामुळे धुमाकूळ घातला. आयपीएल 2024 स्पर्धेत हाय स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले. त्यामुळे गोलंदाजांचं अस्तित्वच नसल्याचं दिसून आलं.

इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार सामन्यात 11 ऐवजी 12 खेळाडू खेळू शकतात. नाणेफेकीनंतर दोन्ही संघांना प्लेइंग इलेव्हन व्यतिरिक्त पाच खेळाडूंची नाव द्यावी लागतात. त्यापैकी एकाची गरजेनुसार इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड केली जाते. फलंदाजी किंवा गोलंदाजी करणारा संघ कधीही या खेळाडूचा वापर करू शकते. दुसरीकडे, रिप्लेस केलेला खेळाडू प्लेइंग 11 मध्ये परत येऊ शकत नाही. दुसरीकडे, आयपीएल नियमानुसार प्लेइंग 11मध्ये फक्त 4 विदेशी खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. जर प्लेइंग 11 मध्ये तीन विदेशी खेळाडू असतील तर चौथा खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरता येऊ शकतो. पण प्लेइंग 11 मध्ये चार विदेशी खेळाडू असतील, तर मात्र पाचव्या विदेशी खेळाडूला सहभागी करता येत नाही.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.