World Cup 2023 साठी टीम इंडियाची ‘या’ तारखेला घोषणा, हे 15 खेळाडू फिक्स!

Icc World Cup 2023 Team India Sqaud | टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.

World Cup 2023 साठी टीम इंडियाची 'या' तारखेला घोषणा, हे 15 खेळाडू फिक्स!
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 3:27 PM

मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप स्पर्धेनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी वर्ल्ड कपसाठी प्रिलिमनरी स्क्वॉड जाहीर केला आहे. त्यानंतर वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी 21 ऑगस्ट रोजी वर्ल्ड कपसाठी 5 सप्टेंबरला टीम इंडियाची घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आता मोठी अपडेट समोर आली आहे.

वर्ल्ड कपसाठी 5 सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची नाव जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय 5 नाही, तर 3 सप्टेंबरला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संघाची घोषणेच्या एकदिवसाधी टीम इंडिया आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. त्यात आता केएल राहुल हा आशिया कपमधील पहिल्या 2 सामन्यांमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे केएल राहुल याला संधी मिळणार की नाही, हा देखील मोठा प्रश्न आहे.

बीसीसीआय आयसीसीच्या नियमांनुसार, वर्ल्ड कपसाठी जास्तीत जास्त 15 खेळाडूंचीच निवड करु शकते. त्यात बीसीसीआयनुसार, केएल राहुल हा फिट झाला असला तरी तो खेळण्यासाठी सक्षम नाही. त्यामुळे बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी केएलला संधी देते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

आयसीसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक क्रिकेट बोर्ड 28 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परवानगीशिवाय वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये बदल करु शकते. त्यानंतरही बदल करता येईल. मात्र 28 सप्टेंबरनंतर आयसीसीची परवानगी आवश्यक असेल. त्यामुळे बीसीसीआय विचारपूर्वक 15 खेळाडूंची निवड करेल.

आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी संभावित टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू | तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.