Shreyas Iyer | बीसीसीआयला विश्वास पटला! श्रेयसबाबतचा निर्णय फिरवणार?

Shreyas Iyer Bcci | श्रेयस अय्यर याने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भाविरुद्ध शानदार खेळी केली. मात्र तो दुर्देवी ठरला. श्रेयसचं 5 धावांनी शतक हुकलं. मात्र श्रेयससाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Shreyas Iyer | बीसीसीआयला विश्वास पटला! श्रेयसबाबतचा निर्णय फिरवणार?
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 9:30 PM

मुंबई | मुंबई क्रिकेट टीमने विदर्भावर मात करत रणजी ट्रॉफी जिंकली. मुंबईने यासह 8 वर्षांची प्रतिक्षा संपवली. मुंबईची रणजी ट्रॉफी जिंकण्याची ही 42 वी वेळ ठरली. रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईच्या विजयात प्रत्येक खेळाडूने विजयी योगदान दिलं. मुंबईच्या विजयात श्रेयस अय्यर याचंही मोठं योगदान होतं. श्रेयसने मुंबईसाठी दुसऱ्या डावात 95 धावांची खेळी केली. श्रेयसला काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आलं होतं. मात्र आता रणजी ट्रॉफी फायनलनंतर बीसीसीआय बॅकफुटवर आली आहे.

एका रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय पुन्हा एकदा श्रेयस अय्यर याच्या वार्षिक कराराबाबत फेरविचार करु शकते. रेवस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, मुंबईसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत सेमी फायनल आणि फायनलमध्ये खेळल्यानंतर बीसीसीआय श्रेयसचा वार्षिक करारत समावेश करु शकते. बीसीसीआयने फेब्रुवारी महिन्यात वार्षिक कराराची यादी जाहीर केली होती. त्यामधून श्रेयस अय्यर आणि ईशान किशन या दोघांना वगळलं होतं.

नक्की काय झालं होतं?

बीसीसीआयने ईशान आणि श्रेयसवर रणजी ट्रॉफी न खेळण्यामुळे वार्षिक करारातून वगळलं होतं. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी करारयुक्त खेळाडूंना टीम इंडियासोबत नसणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचे आदेश दिले होते. मात्र या दोघांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे या दोघांवर ही कारवाई करण्यात आली. ईशान किशन हार्दिकसोबत बडोद्यात सराव करत होता. तर श्रेयसने पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचं कारण श्रेयसने दिलं होतं.

बीसीसीआयला खात्री पटली

श्रेयस त्यानंतर मुंबईसाठी रणजी ट्रॉफी स्पर्धेत सहभागी झाला. श्रेयसने रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी सेमी फायनल आणि फायनल सामन्यात खेळला. श्रेयसला अंतिम सामन्यात बॅटिंग दरम्यान पाठदुखीचा त्रास पुन्हा जाणवला. त्यामुळे श्रेयस पाचव्या दिवशी फिल्डिंगसाठी मैदानात येऊ शकला नाही. त्यामुळे बीसीसीआयला श्रेयस तेव्हा खरं बोलत होता, अशी खात्री बीसीसीआयला पटली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बीसीसीआय श्रेयसचा वार्षिक करारबाबतचा निर्णय बदलू शकते, असं म्हटलं जातंय. आता काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.

विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.