कोरोनामुळे IPL स्पर्धेतील आणखी एक सामना रद्द; उर्वरित हंगामातील सर्व सामने मुंबईत?
चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील आगामी सामना रद्द होण्याची शक्यता आहे. | IPL 2021 Coronavirus CSK RR
मुंबई: चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील आगामी सामना रद्द होण्याची शक्यता आहे. हा सामना दिल्लीत होणार होता. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचे (IPL 2021) उर्वरित सामने मुंबईत खेळवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, त्यासाठी बीसीसीआय अद्याप सरकारी परवानगीच्या प्रतिक्षेत आहे. (IPL 2021 CSK RR game under cloud BCCI awaits govt nod to move base to Mumbai)
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आयपीएल स्पर्धा सुरु ठेवणे कितपत बरोबर आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयात IPL स्पर्धा रद्द करण्यासाठीची याचिकाही दाखल करण्यात आली आहे. बायो बबलमध्ये असूनही खेळाडू आणि संघ व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता बीसीसीआय उर्वरित आयपीएल स्पर्धा मुंबईत घेण्याच्या विचारात आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत कमी होताना दिसत आहे. साधारण 15 मे पर्यंत मुंबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मुंबई आयपीएल स्पर्धेसाठी अधिक सुरक्षित ठिकाण मानले जात आहे.
धोनीच्या CSK मध्ये कोरोनाचा प्रवेश, गोलंदाजी प्रशिक्षकासह तिघे पॉझिटिव्ह
आयपीएलच्या 14 व्या पर्वावर (IPL 2021) कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (KKR vs RCB) यांच्यात नियोजित सामना खेळला जाणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्यात आला होता. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान, आयपीएलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यातच आता कोरोनाने चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या (Chennai Super Kings) ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 2 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
संबंधित बातम्या:
KKR नंतर आता धोनीच्या CSK मध्ये कोरोनाचा प्रवेश, गोलंदाजी प्रशिक्षकासह तिघे पॉझिटिव्ह
(IPL 2021 CSK RR game under cloud BCCI awaits govt nod to move base to Mumbai)