मुंबई : टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. धोनी आता सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. तो आता फक्त आयपीएलमध्ये सीएसके संघाकडून कॅप्टन म्हणून खेळतोय. बीसीसीयआयने धोनी निवृत्त झाल्यावर तीन वर्षांनी एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहते चांगलेच खूश झालेले पाहायला मिळत आहेत. नेमका कोणता निर्णय घेतलाय जाणून घ्या.
टीम इंडियाच्या खेळाडूंना आता सात नंबरची जर्सी घालून खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात धोनीचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया एक वनडे, एक टी-20 आणि एक चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे.
Jersey numbers retired from Indian cricket. [Express Sports]
– Number 10 of Sachin Tendulkar.
– Number 7 of MS Dhoni. pic.twitter.com/bxYqG20NkI
— Johns. (@CricCrazyJohns) December 15, 2023
महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी एकूण 90 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत. तर त्याने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 50.57 च्या सरासरीने 10,773 धावा केल्या आहेत. त्याने भारतासाठी 98 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या आहेत. याशिवाय धोनीने यष्टिरक्षक म्हणून त्याने कसोटीत 256 झेल आणि 38 स्टंपिंग केले. तर एकदिवसीय सामन्यात त्याने 321 झेल आणि 123 स्टंपिंग केले. T20 मध्ये त्याने 57 झेल आणि 34 स्टंपिंग केले.
दरम्यान, बासीसीआयने याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलर याची जर्सी निवृत्त केली होती. सचिन 10 क्रमांकाचा जर्सी घालत होता. शार्दुल ठाकूरने काही सामन्यांमध्ये 10 जर्सी नंबर घातली होती. क्रिकेट चाहत्यांनी त्याला ट्रोल केलेलं त्यानंतर बीसीसीआयने या क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता.