WTC Final Squad : बीसीसीआयने बदलली WTC फायनलची टीम, ‘या’ 5 खेळाडूंना आयपीएल मानवली!

मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने संघांमध्ये पुन्हा कमबॅक केलं आहे. आयपीएलमध्ये केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर रहाणेने संघात स्थान मिळवलं आहे. अशातच बीसीसीयआने संघामध्ये आणखी काही बदल केला आहे.

WTC Final Squad : बीसीसीआयने बदलली WTC फायनलची टीम, 'या' 5 खेळाडूंना आयपीएल मानवली!
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 5:11 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रिलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना काही दिवसांवर आला आहे. या फायनल सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा कायम आहे. तर मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने संघांमध्ये पुन्हा कमबॅक केलं आहे. आयपीएलमध्ये केलेल्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर रहाणेने संघात स्थान मिळवलं आहे. अशातच बीसीसीयआने संघामध्ये आणखी काही बदल केला आहे.

बीसीसीआयने गुरूवारी घोषणा केली असून संघामध्ये आणखी काही खेळाडूंचा समावेश केला आहे. नव्य दमाच्या खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. BCCI निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान आणि इशान किशन, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि मुकेश कुमार यांना यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून घोषित केलं आहे.

फायनल सामना खेळण्याआधी बीसीसीआयने एक खास प्लॅन बनवला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनलपूर्वी रवा सामना झाला पाहिजे, याबाबत विचार सुरू आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, प्रशिक्षक कर्मचारी आणि आयपीएल प्लेऑफमधून बाहेर पडलेले खेळाडू 23 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत.

आयपीएलमध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याने जबरदस्त कमबॅक केलं आहे. आयपीएलमध्ये त्याने ज्य प्रकारचं प्रदर्शन केलं आहे ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. एखाद्या युवा फलंदाजासारखी त्याने बहारदार बॅटींग केली. अजिंक्यच्या अनुभवाचा फायदा संघाला होईल या उद्देशानेच बीसीसीआयने त्याला संघात परत घेतलं आहे.

भारताचा WTC फायनल सामन्यासाठी अंतिम संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....