BCCI ने पेटारा उघडला! वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला BCCI कडून 125 कोटींचं बक्षीस जाहीर

BCCI Secretary Jay Shah announces Prise money team india : टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव कोरत इतिहास रचला. या विजेत्या टीमसाठी बीसीसीआयने बक्षिसाची घोषणा केली असून टीम इंडियाचे खेळाडू आता मालामाल होणार आहेत.

BCCI ने पेटारा उघडला! वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला BCCI कडून 125 कोटींचं बक्षीस जाहीर
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 8:27 PM

टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत टीम इंडियाने वर्ल्ड कपवर नाव  कोरलं. या विजयासह गेल्या 11 वर्षांपासूनचा आयसीसीच्या ट्रॉफीचा दुष्काळ रोहितसेनेने संपवला. टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपवर टीम इंडियाने दुसऱ्यांदा जिंकला आहे. 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने आपला पेटारा उघडला आहे. वर्ल्ड विजेत्या टीमसाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

आयसीसी T20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्याबद्दल टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे. संघाने संपूर्ण स्पर्धेत प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्व खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे आणि चाहत्यांचे अभिनंदन, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फायनल सामन्यामध्ये सात धावांनी पराभव केलेला. या विजयानंतर जगभरातून टीम इंडियाचं कौतुक केलं जातं आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यावर देशभरात मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. टी-20 क्रिकेटध्ये हे दिग्गज आता दिसणार नाहीत, वर्ल्ड कप जिंकल्यावर प्रत्येक खेळडा भावनिक झालेला होता. एखाद्या लहान  मुलासारखे रडताना दिसले, कारण याआधी सेमी फायनल आणि फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे यंदा वर्ल्ड कप जिंकल्यावर प्रत्येक खेळाडू ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं.

सामन्याचा धावता आढावा

टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा विक्रम घेतला होता.  20 ओव्हरमध्ये 176-7  धावा केल्या होत्या. यामध्ये टीम इंडियाकडून विराट कोहली याने 76 धावांची जिगरबाज खेळी केली. त्यासोबतच अक्षर पटेल यानेही महत्त्वाची 47 धावांची खेळी करत सामन्यामध्ये टीम इंडियवरील दबाव केला. टीम इंडियाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिका संघाला 20 ओव्हरमध्ये 169-8 धावाच करता आल्या. टीम इंडियाने सात धावांनी विजय मिळवला, आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. हार्दिक पंड्या 3 तर बुमराह आणि अर्शदीप यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. सामन्यानंतर विराट कोहली याला सामनावीर तर जसप्रीत बुमराहला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.