T20I World Cup 2024 | टी 20 वर्ल्ड कपआधी बीसीसीआयचा मोठा निर्णय

Bcci | भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह नक्की काय म्हणाले? जाणून घ्या.

T20I World Cup 2024 | टी 20 वर्ल्ड कपआधी बीसीसीआयचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 1:53 PM

मुंबई | क्रिकेट चाहत्यांना पुढील काही महिन्यात थरार पाहायला मिळणार आहे. विविध संघ सध्या द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. त्यानंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमानिमित्ताने सर्व खेळाडू हे आयपीएलसाठी भारतात येतील. जवळपास 45-40 दिवस ही स्पर्धा चालेल. त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे. या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या काही महिन्यांआधीच बीसीसीआय अलर्ट मोडवर आली आहे.

आयपीएल स्पर्धेत अनकॅप्डसह अनेक कॅप्ड खेळाडू सहभागी होतात. खेळाडूंना आयपीएल दरम्यान दुखापती होतात. आता टीम इंडियाचे खेळाडू आयपीएलनंतर टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे. आयपीएलमध्ये या खेळाडूंना दुखापत होऊन ते वर्ल्ड कपमधून बाहेर होऊ नयेत, याची खबरदारी म्हणून बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खबरदार घेतली आहे. तसेच आयपीएलमधील सर्व संघांना ताकीद दिली आहे.

जय शाह यांनी आयपीएलआधी खेळाडूंचा वर्कलोड पाहता फ्रँचायजींना अलर्ट केलं आहे. जय शाह यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत याबाबत म्हटलं. “आयपीएल फ्रँचायजींना वार्षिक करार प्राप्त खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंट नियमावलींचं पालन करावं लागेल”, असं जय शाह यांनी म्हटलं.

“हा बीसीसीआयचा आदेश आहे. बीसीसीआय सर्वोच्च संस्था आहे. बीसीसीआयचा निर्णय फ्रँचायजींना बंधनकारक आहे. बीसीसीआय फ्रँचायजीपेक्षा सर्वोच्च आहे. तसेच वार्षिक करारातील खेळाडू टीममधून बाहेर असतील तर त्यांना रणजी ट्रॉफीत खेळावं लागेल”असंही जय शाह यांनी म्हटलं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच जय शाह यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा हाच नेतृत्व करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच हार्दिक पंड्या हा उपकर्णधार असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याआधी राजकोटमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जय शाह यांनी या कार्यक्रमात ही मोठी घोषणा केली. तसेच या कार्यक्रमात सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमला निरंजन शाह यांचं नावही देण्यात आलं.

'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.