World Cup 2023 आधी बीसीसीआय सचिव शहा यांचं रजनीकांत यांना खास गिफ्ट…
Rajinikanth Golden Ticket World Cup 2023 : भारताचं वर्ल्ड कप मिशन 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. अशातच वर्ल्ड कप सुरू होण्याआधी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना गिफ्ट दिलं आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 ची सर्व तयारी चालू झाली असून अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार आहे. भारताचं वर्ल्ड कप मिशन 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. अशातच वर्ल्ड कप सुरू होण्याआधी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना गिफ्ट दिलं आहे.
जय शहा यांचं रजनीकांत यांना खास गिफ्ट
The Phenomenon Beyond Cinema! 🎬
The BCCI Honorary Secretary @JayShah presented the golden ticket to Shri @rajinikanth, the true embodiment of charisma and cinematic brilliance. The legendary actor has left an indelible mark on the hearts of millions, transcending language and… pic.twitter.com/IgOSTJTcHR
— BCCI (@BCCI) September 19, 2023
जय शहा यांनी रजनीकांत यांना वर्ल्ड कपमधील सामन्याचं तिकीट दिलं आहे. हे तिकीट आपल्यासारखं साधं नसून गोल्डन तिकीट आहे. बीसीसीआयने फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. जय शहा यांनी रजनीकांत यांना गोल्ड तिकीट देत त्यांचा सन्मान केल्याचं, बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बीसीसीआयकडून याआधी महानायक अमिताभ बच्चन यांना हे गोल्डन तिकिट दिलं आहे. तर क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरचाही गोल्डन तिकीट देऊन गौरव करण्यात आला आहे. वर्ल्ड कपमधील पहिला सामना चेन्नईमधील चेपॉक स्टेडिअमवर होणार आहे. भारतीय संघाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.
वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघ | रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (W), ईशान किशन (राखीव विकेटीकपर), हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जेडजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह