IND vs SA Final : जय शाह बोलले मग विषय संपला, त्यांचे ‘ते’ शब्द ठरले खरे, Video एकदा पाहाच
BCCI Secretary jay shah : टीम इंडियाने वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरत इतिहास रचलाय. बीसीसीआयचे सचिव जय शाह चार महिन्यांआधी जे बोलले होते अगदी तसंच काहीसं घडलं आहे. त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले होते जाणून घ्या.
आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाने आणि साऊथ आफ्रिकेचा पराभव केला. सात धावांनी विजय मिळवत गेल्या टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांपासून पडलेला दुष्काळ संपवला. टीम इंडियाचं स्वप्न अधुर राहिलेलं होतं अखेर ते वर्ल्ड कपमध्ये पूर्ण झालं. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यावर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा आहे. जय शाहांनी 14 फेब्रुवारी 2024 ला एक कार्यक्रमामध्ये जे बोलले ते अगदी खरं झालं आहे. जय शाह काय म्हणाले होते जाणून घ्या.
टीम इंडियाने फायनलमध्ये विजय मिळवल्यावर बार्बाडोसच्या मैदानावर रोहित शर्माने भारताचा तिरंगा रोवला. यावेळी रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जय शाह तिथे उपस्थित होते. मात्र जय शाह यांनी याबाबत आधीच याबाबत घोषणा केली होती. त्यावेळी जय शाह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टी-20 वर्ल्ड कप खेळणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. कारण टीम इंडियाचं फक्त वेळापत्रक जाहीर झालेलं होतं.
पाहा व्हिडीओ:-
View this post on Instagram
जय शाह काय म्हणाले होते?
अहमदाबादमधील फायलनमध्ये आपण सलग दहा सामने जिंकूनही वर्ल्ड कप जिंकू शकलो नव्हतो. मात्र मी तुम्हाला वचन देतो की, आगामी 2024 मधील टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलला बार्बाडोसमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा झेंडा फडकवणार असं जय शाह म्हणाले होते. जय शाह जे बोलले ते खरं ठरलं आहे. जय शाह यांचे बोलल्याप्रमाणे टीम इंडियानेही एकदम दमदार कामगिरील करत यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत टी-२० वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं आहे.
पाहा व्हिडीओ:-
This is absolutely amazing !
Rohit Sharma with Indian flag 🇮🇳🫡#T20WorldCup2024 #INDvSA pic.twitter.com/WXc21EtbsE
— 🌿 (@liberalwoke_) June 29, 2024
e
दरम्यान, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन बड्या खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे. रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिन्ही दिग्गजांनी टीम इंडियाकडून खेळणार नसल्याचं सांगत निवृत्तीची घोषणा केली आहे.