IND vs SL : टॅलेंट असूनही संधी नाही, टीम इंडियात ‘हा’ खेळाडू राजकारणाचा ‘बळी’

IND vs SL : निवड समितीने या दोन्ही मालिकांमध्ये एका खेळाडूला संधी न देऊन स्वत:चीच अडचण करुन घेतलीय.

IND vs SL : टॅलेंट असूनही संधी नाही, टीम इंडियात 'हा' खेळाडू राजकारणाचा 'बळी'
team india
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 7:35 PM

मुंबई : टीम इंडिया 2023 या नववर्षाची सुरुवात श्रीलंका विरुद्ध टी 20 आणि एकदिवसीय मालिकेने (IND vs SL) करणार आहे. बीसीसीआयने या दोन्ही मालिकांसाठी मंगळवारी 27 नोव्हेंबरला भारतीय संघ जाहीर केला. निवड समितीने या दोन्ही मालिकांमध्ये एका खेळाडूला संधी न देऊन स्वत:चीच अडचण करुन घेतलीय. हा भारतीय खेळाडू राजकारणाचा बळी ठरलाय. टॅलेंटेड असूनही निवड समितीने या खेळाडूला टीमबाहेर बसवलंय. (bcci selection committee not gived chance for leg spinner ravi bishnoi against sri lanka t 20 and odi series)

दूधातून माशी काढावी, तसंच अलगदपणे निवड समितीने रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) बाहेर केलंय. प्रतिभावान असूनही रवीसारख्या टॅलेंटेड लेग स्पिनरला संघात स्थान देण्यात आलं नाही. निवड समितीने युजवेंद्र चहलला टीममध्ये कायम ठेवलंय. चहलची कामगिरी फारशी विशेष राहिलेली नाही. चहलच्या तुलनेत रवी प्रभावी लेग स्पिनर आहे. रवीने आतापर्यंत टीम इंडियासाठी 10 टी 20 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या आहेत.

रवी जेव्हा लेग ब्रेक बॉल टाकतो, तो चहलच्या तुलनेत थोडा फास्ट असतो. ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनसाठी डोकेदुखी वाढते. रवीने अखेरची टी 20 मॅच 4 सप्टेंबर 2022 ला पाकिस्तान विरुद्ध आशिया कपमध्ये खेळला होता. तर शेवटची वनडे 6 ऑक्टोबर 2022 ला खेळला होता. मात्र चहलला वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

हे सुद्धा वाचा

टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.

वनडे सीरीजसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.