Indian Cricket Team | टीम इंडियासाठी अतिशय महत्त्वाची बातमी
टीम इंडियासाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआय थोड्याच वेळात त्या मोठ्या निर्णयाची घोषणा करणार आहे. क्रिकेट चाहत्यांचं याकडे लक्ष असणार आहे.
मुंबई : टीम इंडियासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर असेल. ऑस्ट्रेलिया टीम इंडियाविरुद्ध कसोटी आणि वनडे सीरिज खेळणार आहे. बीसीसीआय 13 जानेवारीच्या संध्याकाळी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 18 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान 3 सामन्यांची वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. तर यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 फेब्रुवारी ते 22 मार्च या कालावधीत 4 टेस्ट आणि 3 सामन्यांची वनडे सीरिज पार पडणार आहे.
टीओआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या निवड समितीची चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे. या बैठकीत न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला जाईल. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांपैकी पहिल्या 2 सामन्यांसाठीही स्कॅवड जाहीर केला जाईल.
पृथ्वी शॉचं कमबॅक होणार?
सध्या बीसीसीआय निवड समितीतील सदस्य हे विविध शहरात आयोजित करण्यात आलेल्या रणजी करंडकातील सामने पाहण्यात व्यस्त आहेत. मुंबईकडून पृथ्वी शॉ याने सर्वोच्च वैयक्तिक खेळी साकारत 379 धावा केल्या. पृथ्वीकडे सातत्याने निवड समितीकडून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप हा नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच पृथ्वी सातत्याने चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे पृथ्वीचं संघात कमबॅक होण्याची शक्यता अधिक आहे
न्यूझीलंडचा भारत दौरा
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद
दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर
तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर
वरील तिन्ही सामन्यांना सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर यानंतर टी 20 मालिका पार पडणार आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली मॅच, 27 जानेवारी, रांची
दुसरी मॅच, 29 जानेवारी, लखनऊ
तिसरी मॅच, 1 फेब्रुवारी, हैदराबाद
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
कसोटी मालिकेचं वेळापत्र
पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली
तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा,
चौथी कसोटी, 9-13 मार्च,
वनडे सीरिज
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.