World Cup 2023 Final | ‘कप जिंकण्याचा प्रयत्न करु नका, फक्त…’, सदगुरुंचा टीम इंडियाला विजयाचा मंत्र काय?

| Updated on: Nov 18, 2023 | 11:45 AM

World Cup 2023 Final | युवा वर्गात लोकप्रिय असलेल्या सदगुरुंनी टीम इंडियाला विजयाचा मंत्र दिलाय. उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे. सध्या सगळ्या देशात क्रिकेटमय वातावरण झालय.

World Cup 2023 Final | कप जिंकण्याचा प्रयत्न करु नका, फक्त..., सदगुरुंचा टीम इंडियाला विजयाचा मंत्र काय?
Ind vs Aus world cup 2023 Final
Follow us on

अहमदाबाद : क्रिकेट विश्वाचा नवीन बादशाह कोण? या प्रश्नाच उत्तर उद्या मिळेल. भारत-ऑस्ट्रेलियामध्ये उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार रंगणार आहे. भारतात क्रिकेटला धर्म, उत्सवाचा दर्जा आहे. प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपल्या स्टाइलमध्ये मेन इन ब्लूला सपोर्ट् करतोय. टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाला रोखण सध्या कठीण दिसतय. तरी सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांच्या मनात एक धाकधूक आहे, फायनलमध्ये भारत ऑस्ट्रेलियाला हरवणार का? हा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेट चाहत्याच्या मनात आहे. या प्रश्नावर प्रत्येकाच स्वत:च एक उत्तर असेल. सदगुरुंनी आपल्या पद्धतीने या प्रश्नाच उत्तर दिलय. भारतीय क्रिकेट फॅन्सच्या मनात जी धाकधूक, चिंता आहे, त्याच उत्तर त्यांनी दिलय.

इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एका युवक सदगुरुंना विचारतो की, वर्ल्ड कप जिंकण्यासाठी तुम्ही टीम इंडियाला काय सल्ला द्यालं. त्यावर सदगुरुं एवढच म्हणाले की, “भारतीय टीमला क्रिकेट खेळता येतं, हे मला माहितीय, मी कशाला काय म्हणू”. कप कसा जिंकायचा यावर सदगुरु म्हणाले. “कप जिंकण्याचा प्रयत्न करु नका, फक्त खेळा. तुम्ही 1 अब्ज लोकांसाठी कप आणण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही बॉल हिट करताना चुकालं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पुढे काय? हा काल्पनिक विचार तुम्ही करत असाल, तर चेंडू तुमचे स्टम्पस उडवेल”


सदगुरु म्हणाले फक्त इतकाच विचार करा

वर्ल्ड कप कसा जिंकायचा याचा विचार करु नका. “बॉल कसा मारायचा? प्रतिस्पर्धी टीमचे विकेट कसे काढायचे? फक्त इतकाच विचार करा” न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल मॅचआधी सुद्धा सदगुरुंनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या होत्या. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बलाढ्य न्यूझीलंडला 70 धावांनी धूळ चारली होती. सदगुरु सुद्धा क्रिकेटचे चाहते आहेत. टीम इंडियाला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आली आहे. याआधी 1983 आणि 2011 साली टींम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. 2003 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अपयश आलं होतं.