आयपीएल 2025 रिटेंशन यादी येण्याआधीच महेंद्रसिंह धोनीचं मोठं वक्तव्य, म्हणाला की…

आयपीएल 2025 स्पर्धेच्या लिलावापूर्वी रिटेंशन यादी समोर येणार आहे. प्रत्येक संघाला 6 खेळाडू रिटेन करता येणार आहेत. त्यामुळे फ्रेंचायझींची आकडेमोड सुरु आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीला अनकॅप्ड प्लेयर म्हणून फ्रेंचायझी रिटेन करू शकते. असं असताना महेंद्रसिंह धोनीने आपल्या खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

आयपीएल 2025 रिटेंशन यादी येण्याआधीच महेंद्रसिंह धोनीचं मोठं वक्तव्य, म्हणाला की...
Follow us
| Updated on: Oct 26, 2024 | 3:46 PM

महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्षे लोटली आहे. पण आयपीएलमध्ये त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. 43 वर्षाच्या धोनीचं गारुड अजूनही क्रीडारसिकांच्या मनावर कायम आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 रोजी जेतेपदावर नाव कोरलं आहे. मागच्या पर्वात महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडलं आणि ऋतुराज गायकवाडने कमान सांभाळली आहे. त्यामुळे दरवर्षी धोनी खेळणार की नाही या प्रश्नांना उधाण येतं. आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी रिटेंशन आणि मेगा लिलाव पार पडणार आहे. त्यामुळे ही उत्सुकता अजून शिगेला पोहोचली आहे. सर्व संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेंशन खेळाडूंची लिस्ट 31 ऑगस्टपर्यंत आयपीएल गव्हर्निंग काउंसिलला सोपवायची आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात महेंद्रसिंह धोनीला रिटेन करणार की नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनीने एका कार्यक्रमात यंदा खेळणार की नाही याबाबत संकेत दिले आहेत.

महेंद्रसिंह धोनीने सांगितलं की, ‘मागच्या काही वर्षात जे काही क्रिकेट खेळलो आहे त्याचा आनंद घेऊ इच्छित आहे. जेव्हा तुम्ही एका व्यावसायिक खेळाप्रमाणे क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला त्याचा आनंद घेणं कठीण होतं. मला आनंद घ्यायचा आहे. मला पुढील काही वर्षे या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. यासाठी मी स्वत:ला नऊ महिने तंदुरुस्त ठेवतो. कारण मला अडीच महिने व्यवस्थितरित्या आयपीएल खेळता येईल. यासाठी योजना आखणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शांत राहणंही आवश्यक आहे.’

महेंद्रसिंह धोनीच्या या वक्तव्यानंतर चेन्नई सुपर किंग्स त्याला अनकॅप्ड प्लेयर म्हणून रिटेन करेल, असं स्पष्ट दिसतंय. फ्रेंचायझील अनकॅप्ड प्लेयरला 4 कोटी रुपयात रिटेन करू शकते. कारण अनकॅप्ड प्लेयरची व्याख्या जर पाहिली तर मागच्या पाच वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या प्लेइंग 11 मध्ये खेळला नसेल किंवा बीसीसीआयसोबत कोणताही करार नसेल अशी आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी अनकॅप्ड प्लेयरच्या यादीत बरोबर फिट बसतो. त्यामुळे धोनीला कमी खर्चात रिटेन करणं फ्रेंचायझीला परवडणारं आहे. धोनीचा अनुभव संघाच्या कामी येणार आहे.

Non Stop LIVE Update
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल
जयश्री थोरात यांच्यावरील वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल, गुन्हा दाखल.
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.