इंग्लंड विरुद्ध सामना होण्यापूर्वीच आयसीसीने पाकिस्तानला केलं बाहेर, व्हिडीओद्वारे अधिकृत घोषणा!
उपांत्य फेरीचा तिढा सुटला आहे. पण पाकिस्तानपुढे अशक्यप्राय असा पर्याय आहे. त्यामुळे न्यूझीलंड उपांत्य फेरीत असला तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. पण आता आयसीसीने पाकिस्तान इंग्लंड सामन्यापूर्वी यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. तत्पूर्वी भारत, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. तर उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंडचं निश्चित आहे. पण पाकिस्तानपुढे अशक्यप्राय गणित असल्याने त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण आता आयसीसीने एका व्हिडीओद्वारे यावर शिक्कामोर्तब केलं आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार हे निश्चित झालं आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी आयसीसीकडून वर्ल्डकपचं प्रमोशन केलं जात आहे. यात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत भिडणार असं स्पष्ट दाखवलं गेलं आहे. आयसीसीने तीन मिनिटांची एक व्हिडीओ क्लिप एक्सवर शेअर केली आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडियावर 3डी प्रोजेक्शन करण्यात आलं. यात शेवटी चार कॅप्टनचं चित्र दाखवण्यात आलं. यात रोहित शर्मा-केन विल्यमसन आणि पॅट कमिन्स-टेम्बा बावुमा यांचं पोस्टर होतं.
आयसीसीने या प्रोजेक्शनच्या माध्यमातून न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचल्याचं सांगितलं आहे. कारण पाकिस्तान इंग्लंडला पराभूत केलं तरी नेटरनरेट गाठणं सोपं नाही. एका तर 287 धावांनी विजय किंवा 284 चेंडू राखून विजय मिळवावा लागेल. हे दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. त्यामुळे 15 नोव्हेंबर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगणार हे तितकंच खरं आहे. पाकिस्तानच्या बाबतीत इतका मोठा चमत्कार होणं खूपच कठीण आहे.
Diwali 🤝 Cricket World Cup
A celebration of two big festivals at the Gateway of India 🤩#CWC23 pic.twitter.com/hgMBd0JwTV
— ICC (@ICC) November 10, 2023
भारत आणि न्यूझीलंड वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुसऱ्यांदा भिडणार आहेत. यापूर्वी 2019 मध्ये न्यूझीलंडने भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरलं होतं. भारताचा 18 धावांनी पराभव झाला होता. तसेच आयसीसी स्पर्धामध्ये न्यूझीलंड कायम वरचढ राहिली आहे. याची प्रचिती अनेकदा आली आहे. वनडे वर्ल्डकप, टेस्ट चॅम्पियनशिप असो की चॅम्पियन्स ट्रॉफी न्यूझीलंडने भारताला पराभवाचू धूळ चारली आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा