Rishabh Pant : वनडे वर्ल्डकपपूर्वी ऋषभ पंत फीट, मैदानात उतरत मारला उत्तुंग षटकार Watch Video
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियात कोणते खेळाडू असतील ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, आक्रमक फलंदाज ऋषभ पंत याने फीट अँड फाईन असल्याचं दाखवून दिलं आहे.
मुंबई : भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंत अपघातानंतर क्रिकेट मैदानापासून लांब आहे. त्याच्या गुडघ्यावर सर्जरी झाल्यानंतर एसीएमध्ये रिकव्हर होत आहे. रिकव्हर होत असताना आयपीएल आणि अनेक स्पर्धांना मुकला आहे. आता आशिया आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत शंका आहे. मात्र असं असताना ऋषभ पंत यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अपघात झाल्यानंतर जवळपास 8 महिन्यानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला. 15 ऑगस्ट 2023 रोजी ऋषभ पंत फलंदाजी करताना दिला. दिल्ली कॅपिटल्स संघाने सोशल मीडियावर ऋषभ पंत याच्या फलंदाजीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात डावखुरा ऋषभ पंत आपल्या शैलीत फलंदाजी करताना दिसला. ऋषभ पंत याने इतक्या जोरदार प्रहार केला की चेंडू थेट सीमा पारच गेला.
काय आहे व्हिडीओमध्ये?
दिल्ली कॅपिटल्स हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, “व्हिडीओची गुणवत्ता भले 144P असेल पण आमच्या डोळ्यातील भावना 1080P आहे. ऋषभ पंत याने स्वतंत्रता दिवस मैदानात घालवला. हे एक स्वप्नासारखं वाटतं.” दिल्ली कॅपिटल्सने या व्हिडीओचं क्रेडीट इसराकअहमद/प्रियांशुमिश्रा यांना दिलं आहे. जेएसडब्ल्यू विजयनगर येथे एका सराव सामन्यात त्याने फलंदाजी केली.
"Woh enjoyment nahi miss karna yaar life mein" 🥹
We cannot agree more, @RishabhPant17 🫶 pic.twitter.com/pYDI3cgJHt
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 16, 2023
@RishabhPant17 back in the ground 😍😍 #rishabhpant pic.twitter.com/M0r1tq9tzl
— Md Israque Ahamed (@IsraqueAhamed) August 16, 2023
ऋषभ पंत जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला तशीच दाद दिली. फलंदाजी करत असताना टाळ्यांचा वर्षाव होत होता. ऋषभ पंत याने लाँग ऑफवरून उंच शॉट मारला चेंडू सीमापलीकडे पाठवला.
ऋषभ पंत याचं डिसेंबर 2022 रोजी कार अपघात झाला होता. त्यानंतर ऋषभ पंत याच्या लिगामेंटची सर्जरी झाली होती. 21 जुलैला बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात ऋषभ पंत विकेटकीपिंग करताना दिसला होता. पण ऋषभ पंत आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपमध्ये खेळण्याची शक्यता कमीच आहे. पण त्याची उणीव संघाला वारंवार जाणवत आहे.
30 डिसेंबर 2022 दिल्लीतून डेहरादून जात असताना पंतच्या मर्सिडीजचा अपघात झाला होता. 4 जानेवारीला पंतला एअर अँबुलन्सने मुंबईला हलवण्यात आलं. 6 जानेवारीला पंतच्या गुडघ्यावर सर्जरी झाली. शस्त्रक्रिया 3 तास चालली. 10 फेब्रुवारीला पंत स्टिकच्या आधारे चालताना दिसला. 15 मार्चला स्विमिंग पूलमध्ये चालताना दिसला. 4 एप्रिलला पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच दिल्ली विरुद्ध गुजरात सामना पाहताना दिसला. 5 मे रोजी कुबड्या न घेता चालताना दिसला. 14 जूनला शिडी चढतानाचा व्हिडीओ समोर आला. 15 ऑगस्टला पहिल्या क्रिकेट खेळताना दिसला.