टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यापूर्वी बांग्लादेशने भारताच्या जखमेवर चोळलं मीठ, कटू आठवणींचा व्हिडीओ शेअर

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामने सुरु आहेत. या फेरीत भारताची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. आता बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकला की उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित होईल. पण या सामन्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचं मन दुखावलं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यापूर्वी बांग्लादेशने भारताच्या जखमेवर चोळलं मीठ, कटू आठवणींचा व्हिडीओ शेअर
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 5:16 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचे सामने रंगतदार वळणावर आले आहेत. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ सुपर 8 फेरीतील एका गटात आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपला पहिला सामना जिंकत पुढे कूच केली आहे. भारताने अफगाणिस्तानला, तर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला पराभूत केलं आहे. आता 22 जूनला भारत विरुद्ध बांग्लादेश हा सामना होत आहे. हा सामना दोन्ही देशांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट आणि बांगलादेशचं स्पर्धेतील अस्तित्व या सामन्यावर टिकून आहे. असं असताना भारतीय क्रीडारसिकांना भारतच जिंकेल असं वाटत आहे. पण बांग्लादेशने यापूर्वी स्पर्धेत अनेक उलटफेर केले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला गाफील राहून चालणार नाही. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत एक्स खात्यावरून शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.

भारत बांग्लादेश सामन्यापूर्वी हा व्हिडीओ शेअर केल्याने पुन्हा एकदा जखम ओली झाली आहे. कारण 2004 साली झालेल्या सामन्यात बांग्लादेशने भारताला पराभूत केलं होतं. नेमका हाच व्हिडीओ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे. 2004 साली वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. बांगलादेशने 50 षटकात 9 गडी गमवून 229 धावा केल्या आणि विजयासाठी 230 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारताला 214 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशने 15 धावांनी विजय मिळवला.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सुपर 8 फेरीआधीच हा व्हिडीओ शेअर केल्याने भारतीय चाहते संतापले आहेत. कारण हा सामना 26 डिसेंबर 2004 रोजी झाला होता. त्यामुळे आता शेअर करण्याचं कारण काही कळलं नाही. 22 जूनला भारत बांग्लादेश महत्त्वाचा सामना होणार आहे. या माध्यमातून डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. आता 22 जूनच्या सामन्यात कोण कोणावर भारी पडतं? हे कळेल. तत्पूर्वी या व्हिडीओखाली दोन्ही देशांचे चाहते भिडले आहेत.

'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.