बेन स्टोक्स याने ॲशेस मालिका संपताच दिलं टीम इंडियाला थेट आव्हान, स्पष्टच म्हणाला की..
ॲशेस मालिकेत इंग्लंडनं जबरदस्त कमबॅक करत मालिक 2-2 ने बरोबरीत राखली. यामुळे इंग्लंडचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. यानंतर इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार असून कर्णधार बेन स्टोक्स याने इशारा दिला.
मुंबई : ॲशेस मालिकेत पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं आहे. इंग्लंडने तिसरा सामना जिंकला आणि चौथा सामना पावसामुळे ड्रॉ झाला. त्यामुळे पाचवा सामना काहीही करून इंग्लंडला जिंकाणं गरजेचं होतं आणि झालंही तसंच..इंग्लंड हा सामना पाचव्या दिवशी आपल्या खिशात घातला आणि मालिक 2-2 ने बरोबरीत सोडवली. ही मालिका संपताच इंग्लंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कंबर कसली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने टीम इंडियाला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीकोनातून ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे.
काय म्हणाला बेन स्टोक्स?
बेन स्टोक्स याने सांगितलं की, “भारत दौऱ्यावर बिनधास्तपणे खेळणार आहोत.” या वाक्यातच बेन स्टोक्स बरंच काही सांगून गेला. इंग्लंडचा संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला 5-0 ने पराभूत करू असाच अर्थ काढला जात आहे.
“जेव्हा आम्ही न्यूझीलंडला 3-0 ने पराभूत केलं तेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करू शकणार नाही, असं सांगितलं गेलं. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धही असंच काहीसं सांगितलं गेलं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॅजबॉल खेळू शकणार नाही. मग असं वाटतं का आम्ही भारताविरुद्ध करू शकणार नाही. आता वेळच याबाबत काय ते सांगेल”, असं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने सांगितलं.
Every single wicket from a magical final day of the 2023 Ashes ✨#EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/vS8810TX65
— England Cricket (@englandcricket) July 31, 2023
बेन स्टोक्सचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड
बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने जिंकली. दक्षिण आफ्रिका विरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली . पाकिस्तानला 3-0 ने मात दिली. न्यूझीलंड विरुद्धचा सामना 1-1 ने ड्रॉ झाला. आयर्लंडला 1-0 ने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. स्टोक्सच्या नेतृत्वात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
भारत इंग्लंड सीरिज कधी?
इंग्लंडचा संघ जानेवारी 2024 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडने भारताला 2012 मध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर मागच्या कसोटी मालिकेत भारताना वचपा काढला होता. मात्र बेन स्टोक्सने भारताला पराभूत करण्याचं स्वप्न पाहात आहे.