IND vs ENG 3rd Test | इंग्लंडच्या पराभवासाठी कोण ठरलं व्हिलन, बेन स्टोक्सने सामन्यानंतर घेतलं नाव!
Ben stokes talk on IND vs ENG 3rd Test : टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत कसोटी क्रिकेट इतिहासामधील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. या पराभवानंतर कर्णधार बेन स्टोक्स याने सामना कुठे गमावला याबाबत सागितलं आहे.
राजकोट : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना रोहित अँड कंपनीने 434 धावांनी जिंकला आहे. कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाने मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला आहे. टीम इंडियाने दुसरा डाव घोषित केल्यावर इंग्लंडला जिंकण्यासाठी 557 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघ 122 धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडचा हा कसोटी क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. सामना संपल्यानंतर इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने नेमका सामना कुढे गमावला हे सांगतिलं आहे.
काय म्हणाला बेन स्टोक्स?
बेन स्टोक्स याने पहिल्या डावात इंग्लंडकडून दीडशे धावांची शानदार खेळी करणाऱ्या बेन डकेट याचं कौतुक केलं. बेन डकेट याने ज्या प्रकारे फलंदाजी केली तोच टोन आम्हाला सेट करायचा होता. टीम इंडियाच्या धावांच्या जवळ पोहोचायचं होतं. मात्र त्यानंतर आमचा डाव गडगडला. आम्हाला गोलंदाजी करायची होती पण अपेक्षेपेक्षा लवकर गोलंदाजी करावी लागल्याचं बेन स्टोक्स याने सांगितलं. पहिल्या डावात इंग्लंड संघाने चांगली सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी टीम इंडियाकडून सिराज याने तीन तर जडेजाने दोन विकेट घेतल्या. इंग्लंड संघाचा डाव 319 वर आटोपला.
काहीवेळा गेम प्लॅन ठरवल्याप्रमाणे यशस्वी होत नाही. आम्ही हा पराभव विसरून आगामी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहोत. मात्र आम्हाला पुनरागमन करून मालिका जिंकण्याची मोठी संधी असल्याचं स्टोक्स म्हणाला.
तिसऱ्या कसोटी सामन्याचा धावता आढावा
तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्य डावात टीम इंडियाने 445-10 धावा केल्या होत्या. यामध्ये रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतके केली होतीत. तर इंग्लंडला संघ अवघ्या 319 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडिया आघाडी घेत मैदानात उतरली होती.
दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल याची नाबाद 214 धावांची द्विशतकी खेळी आणि शुबमन गिल आणि सरफराज खान यांची अर्धशतकाच्या जोरावर 430-4 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ मैदानात उतरल्यावर दीड ते दोन तासाच्या आतमध्ये 122-10 धावांवर आटोपला. रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.