INDvsAUS | टीम इंडियाला इंदूरमध्ये इतिहास रचण्याची संधी, रोहितच्या नेतृत्वात तो कारनामा करणार का?
टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. तर मालिकेतील तिसरा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.
इंदूर | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील इंदूरमधील तिसऱ्या कसोटीतील पहिला दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला आधी स्वसतात ऑलआऊट केलं. त्यानंतर कांगारुंनी दिवसअखेर 47 धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाच्या फलंदाजानी पहिल्या दिवशी निराशाजनक कामगिरी केली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला इंदूर कसोटीत इतिहास करण्याची संधी आहे. इंदूर कसोटी जिंकल्यास टीम इंडियाच्या नावावर असलेला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी मजबूत होईल.
टीम इंडियाने आतापर्यंत एकूण सलग 15 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाने इंदूर कसोटी जिंकल्यास सलग 16 वा कसोटी मालिका विजय ठरेल. टीम इंडियाच्या या वर्ल्ड रेकॉर्डच्या आसपासही कोणतीही टीम नाही.
टीम इंडियाने नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर टीम इंडिया भारतात सलगपणे टेस्ट सीरिज जिंकत आली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा नंबर लागतो. ऑस्ट्रेलियाने आपल्या घरात 2 वेळा सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. टीम इंडियाने भारतात गेल्या 44 कसोटी सामन्यांपैकी फक्त 2 सामने गमावले आहेत.
टीम इंडियाची 2013 पासूनची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी
टीम इंडियाने भारतात 2013 पासून एकूण 44 कसोटी सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाने 36 मॅचमध्ये विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.
तिसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा धावता आढावा
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाचा काटा काढला. टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 4 विकेट्स गमावून 47 धावांच्या आघाडीसह 156 धावा केल्या आहेत.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेने, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.