INDvsAUS | इंदूर कसोटी संपताच कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय, आता या खेळाडूकडे जबाबदारी
बॉर्डर गावसकर या 4 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवला.
इंदूर | टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत धमाकेदार सुरुवात केली. नागपूर आणि दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. टीम इंडिया यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर पोहचली. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा कसोटी सामना जिंकून मालिका विजयासह हॅट्रिकची करण्याची संधी होती. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं तिकीट कन्फर्म करण्याची संधी होती. मात्र इंदूर कसोटीत फासे उलटे पडले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 2 पराभवानंतर तिसऱ्या कसोटीत जोरदार मुसंडी मारत टीम इंडियावर 9 विकेट्सने पराभव केला.
तिसरी कसोटी संपताच कॅप्टनने माझी वेळ संपली आहे. आता ही टीमची जबाबदारी दुसऱ्याची आहे, असं कॅप्टन म्हणाला. ऑस्ट्रेलियाचा नियमित कॅप्टन पॅट कमिन्स हा कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात उपकर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथ याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. स्टीव्हने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मात्र आता तिसऱ्या सामन्यानंतर “माझी वेळ संपली आहे. आता ही टीम पॅटची आहे”, असं स्टीव्ह म्हणाला.
पॅट कमिन्स याला त्याच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने तिसऱ्या सामन्यातून रिलीज करण्यात आलं होतं. यानंतर पॅट मायदेशी परतला होता. यानंतर स्टीव्हला जबाबदारी देण्यात आली. आता चौथ्या कसोटीत पॅट पुन्हा नियमितपणे ऑस्ट्रेलियाची जबाबदारी सांभाळणार आहे.
स्टीव्ह आणखी काय म्हणाला?
भारतात मला कॅप्टन्सी करायला आवडतं. कर्णधारपद हे बुद्धीबळाप्रमाणे आहे, जिथे प्रत्येक क्षणाला महत्व आहे. फलंदाजांना वेगवेगळ्या पद्धतीने खेळायला भाग पाडणं आणि त्यांच्यासोबत खेळणं हे मजेशीर आहे”, असं स्टीव्हने स्पष्ट केलं.
दरम्यान मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा हा सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न असेल. तर टीम इंडियासाठी हा सामना ‘करो या मरो’चा असणार आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहाचायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत अहमदाबादमध्ये विजय मिळवावा लागेल.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.