INDvsAUS | भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीत कॅप्टन ते गोलंदाजांपर्यंत अशी बदलणार टीम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे.टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.
इंदूर | टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. नागपूर आणि त्यानंतर दिल्लीत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने पाहुण्या कांगारुंचा धुव्वा उडवला. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने अशा फरकाने आघाडीवर आहे. सीरिजमधील तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 1 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे.या तिसऱ्या सामन्यात टीममध्ये कॅप्टनपासून ते गोलंदाजांपर्यंत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याला तिसऱ्या कसोटीतून मुक्त करण्यात आलं आहे. पॅटच्या आईची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे पॅट मायदेशी परतला आहे. त्यामुळे उपकर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या सामन्यात कर्णधारपद भूषवणार आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाचे बरेचसे खेळाडू दुखापतीमुळे आणि इतर कारणांमुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफीतून बाहेर पडले आहेत. यामुळे तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, हे निश्चितच आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज मायकल कास्प्रोविच यांनीही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावा, असा सल्ला दिला आहे.
कास्प्रोविच यांनी तिसऱ्या कसोटीत मिचेल स्टार्क, कॅमरुन ग्रीन आणि स्कॉट बॉलँड यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करावा, असं म्हटलंय. वेगवान गोलंदाजी हा ऑस्ट्रेलियाचा आत्मा आहे. टीमला आपल्या जमेची बाजू असलेल्या गोष्टीचं समर्थन करायला हवं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आपल्या माजी खेळाडूचा सल्ला ऐकणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान टीम इंडियासाठी इंदूर टेस्ट ही महत्वाची आहे. टीम इंडियासाठी इंदूर कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि निर्णायक आहे. त्यामुळे टीम इंडियाही तिसरी कसोटी सामन्यात जोर लावणार आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव स्मिथ (कॅप्टन), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मैथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.