Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा याचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाका, सचिन-विराटच्या या विक्रमाची….

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात मोठा रेकॉर्ड केला आहे.

Rohit Sharma | कॅप्टन रोहित शर्मा याचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाका, सचिन-विराटच्या या विक्रमाची....
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 2:54 PM

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. टीम इंडियासाठी हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फार महत्वाचा आहे.ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 धावा केल्या. आता टीम इंडिया या धावांचं शानदार पद्धतीने पाठलाग करत आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने मोठा कारनामा केला आहे. रोहितने यासह सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंकतीत स्थान मिळवलं आहे.

टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला बिनबाद 36 धावांपासून सुरुवात केली. रोहित 17 धावांवर नाबाद होता. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आणि रोहितने कारनामा केला. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. रोहित अशी कामगिरी करणारा सातवा भारतीय ठरला. रोहित यासह सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या यादीत जाऊन पोहचला. रोहितने ही कामगिरी 438 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पूर्ण केली.

रोहितला या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 17 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 21 धावांची गरज होती. रोहितने या 21 धावा यशस्वीपणे पूर्ण केल्या. यासोबतच रोहित भारतात कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 2 हजार धावा करणारा टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला.

हे सुद्धा वाचा

रोहितने 36 डावांमध्ये ही कामगिरी केली. दरम्यान रोहित चांगल्या प्रकारे खेळत होता. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित 35 धावा करुन तंबूत परतला. रोहितने 58 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 35 रन्स केल्या.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 180 रन्स केल्या. त्यानंतर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची शतकी खेळी केली. उस्मान आणि ग्रीन या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फी याने नाबाद 41 धावा केल्या. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावा करुन माघारी परतला. नॅथन लायन याने 34 रन्सचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड याने 32 रन्स केल्या. पीटर हँड्सकॉम्ब याने 17, मिचेल स्टार्क 6 आणि मार्नस लाबुशेन याने 3 धावा केल्या. एलेक्स कॅरी याला अश्विनने भोपळाही फोडु दिला नाही. तर कुहनेमॅन शून्यावर नाबाद परतला. टीम इंडियाडून अश्विनशिवाय मोहम्मद शमी याने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.