INDvsAUS | अहमदाबाद कसोटीतून टीम इंडियाचा प्लेअर बाहेर, या खेळाडूला संधी
टीम इंडियासाठी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारा चौथा कसोटी सामना हा 'करो या मरो' असा आहे.
अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना हा 9 मार्चपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातं आयोजन हे नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद इथे करण्यात आलंय. टीम इंडियासाठी हा चौथा कसोटी सामना अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून एका प्लेअरला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.
रोहित चौथ्या कसोटीतून विकेटकीपर बॅट्समन केएस भरत याला प्लेइंग इलेव्हनमधून आऊट करु शकतो. केएसच्या जागी इशान किशन याला पदार्पणाची संधी मिळू शकते.
केएस भरत याला सलग 3 सामन्यात संधी देण्यात आली. मात्र केएसला आपली छाप सोडता आली नाही. केएल तिन्ही सामन्यात बॅटिंगने सपशेल अपयशी ठरला. तसेच या तिन्ही मॅचमध्ये विकेटकीपिंगदरम्यान केएल अडखळताना दिसून आला.
टीम इंडियाला चौथा कसोटी सामना हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने अत्यंत महत्वाचा आहे. टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. केएसला याआधीच्या सामन्यात धावा करता आल्या नाहीत.
तर दुसऱ्या बाजूला इशान किशन आक्रमक बॅटिंग करतो. तसेच विकेटकीपिंगही शानदार करतो. त्यामुळे इशान किशन याला डेब्यूची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
केएस भरत आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या नागपूर कसोटीतून पदार्पण केलं होतं. मात्र या दोघांनाही आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे सूर्यकुमारला याआधीच प्लेइंग इलेव्हनमधून आऊट केलं. त्यामुळे आता इशानला संधी मिळाल्यास तो कशी कामगिरी करणार, याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
स्टीव्ह स्मिथ कॅप्टन्सी करणार
दरम्यान या चौथ्या सामन्यातही स्टीव्ह स्मिथ हाच ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. नियमित कर्णधार स्टीव्ह स्मिथ चौथ्या कसोटीसाठी भारतात परतणार होता. मात्र त्याच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने पॅट कमिन्स सिडनी इथेच थांबला आहे. यामुळे स्टीव्ह स्मिथ नेतृत्व करेल.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.