INDvsAUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी वाईट बातमी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी टेस्ट मॅच ही 9 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई | टीम इंडियाने पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील नागपूर आणि त्यानंतर दिल्ली कसोटीत पराभव केला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जोरदार कमबॅक केलं आणि टीम इंडियाला इंदूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाची यासह विजयाची प्रतिक्षा संपली. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आता मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना हा 9 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे.
उभयसंघातील या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंटनी अल्बनीज उपस्थित असणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचे काही तिकीट लॉक करण्यात आले आहेत.
टीम इंडियासाठी वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. फायनलमध्ये पोहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. त्यामुळे हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याची अनेकांची इच्छा होती. मात्र पहिल्या दिवसाचे काही तिकीट्स लॉक केल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
मॅच ड्रा झाल्यास काय होणार?
दरम्यान चौथा कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला किंवा अनिर्णित राहिला तर टीम इंडियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं भवितव्य हे श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागेल.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन एगर, स्टीव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.