रोहित शर्मा याचा ‘डाव’ यशस्वी, टीम इंडियाचा पहिल्या कसोटीत विजय निश्चित

| Updated on: Feb 09, 2023 | 6:46 PM

कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत आहेत. या सामन्यात रोहित शर्माने चाल केलीय. रोहितची ही चाल यशस्वी ठरलीय.

रोहित शर्मा याचा डाव यशस्वी, टीम इंडियाचा पहिल्या कसोटीत विजय निश्चित
Follow us on

नागपूर : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसअखेर टीम इंडिया 100 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने 77 धावा करुन 1 विकेट गमावली. केएल राहुलच्या रुपाने टीम इंडियाने एकमेव विकेट गमावली. पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा मैदानात कॅप्टन रोहित शर्मा आणि आर अश्विन नॉट आऊट होते. दरम्यान कॅप्टन रोहितने रचलेल्या सापळ्यात कांगारु अडकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा नागपूरमध्ये निश्चित समजला जात आहे.

रोहितने पहिल्या कसोटीत असं ब्रह्मास्त्र वापरलंय ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा सुपडा साफ झाला. रोहितच्या या भरोशाच्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठवला. कुणी विचारही केला नसेल की ऑस्ट्रेलियासारखी 1 नंबर टीम अशा प्रकारे गुडघे टेकेल.

टीम इंडियाच्या या खेळाडूसमोर ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला टीकता आलं नाही. या खेळाडूच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया 180 धावांआधीच ऑलआऊट झाली. रवींद्र जडेजाने फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत धाडला. जडेजाने 5 महिन्यांनी कमबॅक करत 5 विकेट्स घेतल्या.

हे सुद्धा वाचा

जडेजाची नागपूरमधील कामगिरी

नागपूरमध्ये जडेजाची शानदार कामगिरी राहिली आहे. ताज्या आकडेवारीनुसार जडेजाच्या नावावर आता 4 कसोटींमध्ये 17 विकेट्स झाल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा विजय हा निश्चित मानला जात आहे.

नागपूरमध्ये उभयसंघात अखेरचा सामना हा 2008 साली खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 172 धावांनी विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला. बॅटिंगचा निर्णय घेतला. ओपनिंगला डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा आले. पण दुसऱ्या ओव्हरमध्येच कांगारुंना पहिला धक्का बसला. उस्मान ख्वाजा एलबीडब्ल्यू झाला. मोहम्मद सिराज याने ख्वाजाला 1 रनवर आऊट केलं.

त्यानंतर लगेचच तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर सिराजनं धक्का दिला. डेविड वॉर्नरला आऊट केलं. दबावात असताना मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनाी ऑस्ट्रेलिया डाव सावरला. तिसऱ्या विकेट्ससाठी 82 धावांची पार्टनरशीप केली. पण विकेटकीपर केएस भरत याने हुशारीने मार्नसला 49 रन्सवर स्टंपिंग केलं.

त्यानंतर आलेला मॅट रेनशॉ भोपळाही फोडू शकला नाही. जडेजाने एलबीडब्ल्यू केला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ 37, एलेक्स कॅरी 36, पॅट कमिन्स 6, टोड मर्फी 0, पीटर हँडस्कॉम्ब 31, स्कॉट बोलँड 1 अशा धावा करून तंबूत परतले.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.