IND vs AUS : पर्थ कसोटीत पाऊस खोडा घालणार? सामन्यादरम्यान कसं असेल हवामान?
IND vs AUS Perth Weather And Rain Report : न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत पावसाची एन्ट्री न्यूझीलंडच्या पथ्यावर पडली होती. त्यात आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी जाणून घ्या की पर्थमध्ये हवामान कसं असेल?
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या अपत्याच्या जन्मामुळे पर्थमध्ये 22 नोव्हेंबरपासून होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. त्यात शुबमन गिल याला दुखापतीमुळे सलामीच्या सामन्याला मुकावं लागणार असल्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाला सलग आणि एकूण तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या 5 सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने विजय मिळवायचा आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी प्रत्येक सामना, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक ओव्हरमधील प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे. अशात पर्थमधील हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांनी चिंता वाढली आहे.
टीम इंडियाचे खेळाडू सलामीच्या सामन्यासाठी पर्थमध्ये जोरदार सराव करत आहेत. मात्र पर्थमध्ये सामन्याआधी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाचं पर्यायाने चाहत्यांना टेन्शन आलं आहे. ऑस्ट्रेलियात सध्या समर सीजन सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर ते मे दरम्यान पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर असते. मात्र मंगळवारी 19 नोव्हेंबरपासून पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थात 3 दिवसांआधी सामन्यावर पावसाचं सावट आहे. मात्र काळजी करायची गरज नाही.
स्थानिक हवामान विभागाच्या वेबसाईटनुसार, पुढील 3 दिवस तर पाऊस होण्याची शक्यता ही 50-70 टक्के इतकी आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्थात 22 नोव्हेंबरला हवामान स्वच्छ असणार आहे. त्यामुळे खेळात कोणताही व्यत्यय येणार नाही. तसचे सामन्यातील पाचही दिवस हवामान स्वच्छ असेल. त्यामुळे सामन्यात पाऊस खोडा घालणार नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), मिचेल स्टार्क, ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, एलेक्स कॅरी, मार्नस लाबुशेन, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मिचेल मार्श, नॅथन मॅकस्विनी, जॉश इंग्लीश आणि जॉश हेझलवुड
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.