AUS vs IND: टीम इंडियाची एकहाती सत्ता, ऑस्ट्रेलिया गेल्या 10 वर्षात अपयशी
India vs Australia : ऑस्ट्रेलिया गेल्या 10 वर्षांपासून टीम इंडिया विरुद्ध सातत्याने अपयशी ठरली आहे. टीम इंडियाने या 10 वर्षात कांगारुंना अनेकदा चितपट केलंय.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या काही वर्षात अनेक चुरशीचे सामने झाले आहेत. क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही महिन्यांमध्ये इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने दोन्ही वेळा टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे रोहितसेनेला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागंल. मात्र टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध एका प्रतिष्ठेच्या मालिकेत 10 वर्षांपासून एकताही सत्ता आहे. टीम इंडियाचा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दबदबा राहिला आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेला ‘बॉर्डर गावस्कर ट्रॉफी’ असंही म्हटलं जातं. एलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर या 2 दिग्गज खेळाडूंच्या नावाने ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यात ही कसोटी मालिका खेळवली जाते. टीम इंडियाने गेल्या 10 वर्षात सलग 4 वेळा या प्रतिष्ठेच्या कसोटी मालिकेत कांगारुंना लोळवलंय. टीम इंडियाने 4 वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात ही कामगिरी केली आहे. विराट कोहली-अजिंक्य रहाणे, या कर्णधारांच्या नेतृत्वात टीम इंडियाने कांगारुंना लोळवलंय.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 16 कसोटी मालिका (bgt) खेळवण्यात आल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाच वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 16 पैकी 10 कसोटी मालिकांमध्ये कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. तर कांगारुंनी 5 वेळा टीम इंडियावर मात केली आहे. तर एकदा ही मालिका बरोबरीत राहिली आहे. उभयसंघात गेल्या 10 वर्षांमध्ये 4 वेळा कसोटी मालिका (bgt) झाली आहे. टीम इंडियाने या चारही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माज उतरवला
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 2 वेळा माज उतरवला. टीम इंडिया व्यतिरिक्त कोणत्याच संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी कामगिरी करता आलेली नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत पराभूत केलं. टीम इंडियाने 2018-2019 आणि 2021-2022 अशा 2 वेळा टीम इंडियाने कांगारुंचा पराभव केला आहे. टीम इंडियाने 2018-2019 या कसोटी मालिकेत विराट कोहली याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. तर अजिंक्य रहाणे याने आपल्या नेतृत्वात 2021-2022 मध्ये भारताला विजयी केलं होतं. दरम्यान आता उभयसंघातील कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत पहिल्यांदाच 5 सामने होणार आहेत.