VIDEO : भाई वाह… असं म्हणाल, जेव्हा शिमरॉन हेटमायरचा हा कॅच पाहाल, पहिल्या T20मध्ये न्यूझीलंडनं इंडिजला चांगलंच धुतलं

न्यूझीलंडनं पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 13 धावांनी पराभव केला. यादरम्यान शिमरॉन हेटमायरनं जोरदार चर्चा रंगली. त्यानं एक अप्रतिम झेल घेतलाय, चर्चा तर होणारच ना, याविषयी जाणून घ्या...

VIDEO : भाई वाह... असं म्हणाल, जेव्हा शिमरॉन हेटमायरचा हा कॅच पाहाल, पहिल्या T20मध्ये न्यूझीलंडनं इंडिजला चांगलंच धुतलं
शिमरॉन हेटमायरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 7:39 AM

नवी दिल्ली : जमैका येथे झालेल्या पहिल्या टी-20 (T-20) सामन्यात न्यूझीलंड संघानं (Newzeland) वेस्ट इंडिजचा (West Indies) 13 धावांनी पराभव करत दौऱ्याची विजयी सुरुवात केली. यासह किवी संघानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. येथे पाहुण्यांनी सामना जिंकला. परंतु हेडलाईन यजमान संघाच्या शिमरॉन हेटमायरकडे (Shimron Hetmyer) गेले. खरंतर क्षेत्ररक्षणादरम्यान या 25 वर्षीय खेळाडूनं पकडला असा अप्रतिम झेल, ज्याला पाहून तुम्हीही म्हणाल ‘भाई वाह’.न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलचा हा झेल हेटमायरने घेतला. या सामन्यात त्यांनी नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कॉनवे आणि गप्टिल यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी करून संघाला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, यावेळी हेटमायरनं घेतलेल्या अप्रतिम झेलची चांगलीच चर्चा रंगली. चाहत्यांनाही हा झेल खूप आवडला.

हा व्हिडीओ पाहा

हेटमायर सतर्क

7व्या षटकासह आलेल्या ओडियनला स्मिथच्या तिसऱ्या चेंडूवर गुप्टिल पॉइंटवर षटकार मारायचा होता. गप्टिलने मोठा फटका खेळला, पण तिथे सीमारेषेवर पोस्ट केलेला शिमरॉन हेटमायर सतर्क दिसत होता. हेटमायरने हवेत उडी मारून डाव्या हाताने झेल पकडला.  क्षेत्ररक्षकाचा हा दमदार प्रयत्न पाहून विंडीज संघासह किवी फलंदाजही अवाक झाले. गप्टिल 17 चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह 16 धावा काढून बाद झाला.

हायलाईट्स

  1. न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 185 धावा केल्या
  2. कॉनवेनं 43 तर केन विल्यमसनने 47 धावांची शानदार खेळी केली
  3. जिमी नीशमने 15 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण 33 धावा केल्या
  4. 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 172 धावाच करू शकला
  5. न्यूझीलंडच्या विजयाचा नायक होता मिचेल सँटनर. यानं 4 षटकांच्या कोटामध्ये 4 मोठ्या विकेट घेतल्या

इंडिजची धुलाई केली

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 185 धावा केल्या. कॉनवेनं 43 तर केन विल्यमसनने 47 धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी जिमी नीशमने 15 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण 33 धावा केल्या. 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 172 धावाच करू शकला. शामराह ब्रुक्स (42), रोमॅरियो शेफर्ड (33*) आणि ओडियन स्मिथ (27*) यांनी शानदार खेळी खेळली, तर न्यूझीलंडच्या विजयाचा नायक होता मिचेल सँटनर, ज्याने 4 षटकांच्या कोटामध्ये 4 मोठ्या विकेट घेतल्या आणि केवळ 19 धावा दिल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.