Bhuvneshwar Kumar IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमात धमाका करण्यासाठी भुवनेश्वर सज्ज, हैदराबादसाठी हुकमाचा एक्का!

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), भारताचा इनस्विंगर गोलंदाज. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या झटपट विकेट्स मिळवण्यात त्याचा हात कुणी धरु शकणार नाही. | Bhuvneshwar kumar IPL 2021

Bhuvneshwar Kumar IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमात धमाका करण्यासाठी भुवनेश्वर सज्ज, हैदराबादसाठी हुकमाचा एक्का!
Bhuvneshwar Kumar
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 8:35 PM

मुंबई : भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), भारताचा अप्रतिम इनस्विंगर गोलंदाज. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या झटपट विकेट्स मिळवण्यात त्याचा हात कुणी धरु शकणार नाही. त्याच्या बोलिंगची काही वैशिष्ट्ये आहेत. तो एवढा अप्रतिम इनस्विंग करतो की समोरच्या फलंदाजाला काही कळायच्या आत त्याने टाकलेला बॉल स्टम्पमध्ये येतो. तो नेहमी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. दिशा सोडून तो फार कमी वेळा बोलिंग करतो. त्याचमुळे त्याला अधिक विकेट्स मिळतात. पॉवरप्ले मध्ये ओपनिंग बॅट्समनला बाद करण्याची त्याच्याकडे खास कला आहे. तसंच डेथ ओव्हर्समध्ये अतिशय टिच्चून गोलंदाजी करण्यासाठी त्याची ओळख आहे. तो बॅट्समनला हात मोकळे करण्यास फार कमी संधी देतो. भुवनेश्वर कुमार आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) या संघाकडून खेळतो. हैदराबादच्या बोलिंग आक्रमणाचा भार तोच सांभाळतो. त्याच्या क्रिकेट करिअरवर आपण नजर टाकूया… (Bhuvneshwar kumar IPL 2021 SH Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos indian Cricket Players Latest News in Marathi)

भुवनेश्वरचं टेस्ट, वनडे आणि टी ट्वेन्टीत पदार्पण कधी?

कसोटी पदार्पण- भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी 2013 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. वनडे पदार्पण – भुवनेश्वर कुमारने पाकिस्तानविरुद्ध डिसेंबर 2012 मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. टी ट्वे्न्टी पदार्पण- भुवनेश्वर कुमारने दपाकिस्तानविरुद्ध डिसेंबर 2012 मध्ये टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय.

डेव्हिड वॉर्नरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी

फॉरमॅट   मॅच     इनिंग     विकेट्स   सर्वाधिक विकेट्स    इकोनॉमी कसोटी    21       37        63                   8/96                2.94 वन डे      115     114       134                 5/42                5.41 टी ट्वेन्टी    48      48        45                5/24                6.98 IPL          121    121       136               5/19                 7.23

भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत 21 कसोटी मॅचेसमध्ये 63 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यातील एकाच कसोटीत 96 धावांत 8 गडी बाद हा त्याचा सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स ठरला आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने 115 मॅचेसमध्ये त्याने 114 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यातील 42 धावा देत 5 गडी बाद हा त्याचा सर्वोत्तम फरफॉर्मन्स होता. दुसरीकडे टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 48 मॅच खेळल्या आहेत. त्यात त्याने 45 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामध्ये 24 धावांत 5 गडी बाद हा त्याचा सगळ्यात चांगला फरफॉर्मन्स ठरला आहे. तर आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 121 सामन्यांत 136 विकेट्स मिळवल्या आहेत. 19 धावा देऊन प्रतिस्पर्धी संघाचे 5 गडी बाद ही हा त्याचा आयपीएलमधला सर्वोत्तम फरफॉर्मन्स ठरला आहे.

आयपीएलचा थरार 9 एप्रिलपासून…

आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. या 14 व्या मोसमाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. 9 एप्रिल ते 30 मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स (Muambai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals challengers banglore) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

हैदराबादसाठी हुकमी एक्का

भुवनेश्वर कुमार विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मोक्याच्या क्षणी विकेट्स घेऊन प्रतिस्पर्धी संघावर हावी होण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो. तसंच कमी धावा देऊन जास्तीत जास्त विकेट्स मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. याचमुळे हैदराबादसाठी तो हुकमाचा एक्का आहे.

वॉर्नरच्या नेतृत्वात हैदराबादला 2016 ला विजेतेपद

हैदराबादला आतापर्यंत एकदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावण्यात यश आले होते. हैदराबादने 2016 मध्ये वॉर्नरच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती. हैदराबादने गेल्या मोसमात टॉप 3 मध्ये एंट्री मारली होती. मात्र क्वालिफायर 2 सामन्यात दिल्लीकडून पराभव झाल्याने हैदराबादचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर संपला होता. हैदराबादने गेल्या मोसमात एकूण साखळी फेरीतील 14 सामन्यांमधून 7 सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे या मोसमात गत मोसमापेक्षा आणखी दमदार कामगिरी करण्याचा मानस हैदराबादचा असणार आहे.

(Bhuvneshwar kumar IPL 2021 SH Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos indian Cricket Players Latest News in Marathi)

हे ही वाचा :

David warner IPL 2021 Sunrisers Hydrabad Team Player : आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी डेव्हिड वॉर्नर सज्ज, हैदराबादला विजेतेपद मिळवून देण्यासाठी उत्सुक

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.