RR vs SRH : भुवनेश्वर कुमार याच्या क्वालिटी यॉर्करवर जोस बटलरने टेकले गुडघे, पाहा Video

जोस बटलर याने 95 धावांची आक्रमक खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या 5 धावांनी बटलरचं शतक हुकलं कारण भुवनेश्वर कुमार याने टाकलेल्या अफलातून यॉर्करचं त्याच्याकडे काहीचं उत्तर नव्हतं.

RR vs SRH : भुवनेश्वर कुमार याच्या क्वालिटी यॉर्करवर जोस बटलरने टेकले गुडघे, पाहा Video
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 11:28 PM

मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे. प्रथम बॅटींग करणाऱ्या राजस्थानने हैदराबादला 215 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अब्दुल समदने सिक्स मारत विजय मिळवून दिला. याआधी राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याने 95 धावांची आक्रमक खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या 5 धावांनी बटलरचं शतक हुकलं कारण भुवनेश्वर कुमार याने टाकलेल्या अफलातून यॉर्करचं त्याच्याकडे काहीचं उत्तर नव्हतं.

पाहा व्हिडीओ-

19 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमार याने तिसरा चेंडू यॉर्कर टाकला, जोस बटलर गडबडला त्याला समजल नाही अन् बॉल पॅडवर आदळला. अंपायरने आऊट दिलं नाही त्यानंतर भुवीने डीआरएस घेतला. त्यामध्ये बॉल बॅट न लागता पॅडला लागलेला होता आणि थेट विकेटवर गेलेला.

भुवीच्या या बॉलने बटलर 95 धावांवर आऊट झाला. मात्र 5 धावांनी त्याचं यंदाच्या मोसमातील शतक राहून गेलं. बटलर गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरत होता. त्यालाही आपली फॉर्मची गाडी रूळावर आणायची होती. आजचा सामना त्याच्यासाठी पर्वणी ठरला खरा पण संघ हरल याची खंत त्याच्या मनात राहणार आहे.

दरम्यान, अगदी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखा हा रोमांचक सामना झालेला पाहायला मिळाला. ग्लेन फिलिप्सने सलग 3 सिक्स मारत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. शेवटला या आशेचं विजयामध्ये रूपांतर करत अब्दुल समदने फ्री हिटवर सिक्स मारत सामना खिशात घातला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.