BBL 2024-25 : ग्लेन मॅक्सवेलने पकडला जबरदस्त झेल, सिक्स गेलेला चेंडू असा ढकलला आत आणि.. Video
बिग बॅश लिग 2024-25 स्पर्धेतील 19वा सामना ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सुरु आहे. ब्रिस्बेन हीटने 20 षटकात 7 गडी गमवून 149 धावा केल्या आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने घेतलेला झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
बिग बॅश लीगच्या 19व्या सामन्यात मेलबर्न स्टार्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रिस्बेन हीट संघाला सुरुवातीलाच धक्के बसले.आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. टॉम बॅन्टॉन आणि कॉलिन मुनरो स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आले मॅकस्वीनी आणि रेनशॉ देखील काही खास करू शकले नाही. अशी नाजूक स्थिती असताना मॅक्स ब्रायन्टने एका बाजूने खिंड लढवली. त्या पॉल वॉल्टरची साथ मिळाली. पण पॉल वॉल्टर बाद झाल्यानंतर विल प्रेस्टविज मैदानात उतरला. 9 चेंडूंचा सामना करत 4 धावा केल्या होत्या. त्यामुळे झटपट धावा करण्याचं दडपण त्याच्यावर होतं. 17 वं षटक डॅन लॉरेन्स टाकत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विलने उत्तुंग फटका मारला.
विल प्रेस्टविजने मारलेला फटका इतका उंच होता की षटकार असं मैदानात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला वाटत होतं. पण झालं भलतंच..शेवटच्या क्षणापर्यंत ग्लेन मॅक्सवेल चेंडूवर नजर ठेवून होता. अगदी सीमारेषेवर पोहोचल्यावर मोक्याच्या क्षणी उडी घेतली आणि बॉल हवेतच पकडून आत फेकला. इतकंच काय तर पुन्हा आत येत चेंडू पकडून विलला तंबूचा रस्ता दाखवला.
WHAT A CATCH BY GLENN MAXWELL…!!!! 🤯
– ONE OF THE GREATEST IN BBL HISTORY. pic.twitter.com/X8mzx9sisR
— Johns. (@CricCrazyJohns) January 1, 2025
विल प्रेस्टविजचा खेळ 4 धावांवर संपुष्टात आला. बाद झाला तेव्हा संघाच्या 106 धावा होत्या. त्यानंतर मॅक्स ब्रायंटनने मोर्चा सांभाळला. त्याने 48 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकाराच्या मदतीने नाबाद 77 धावा केल्या. दुसरीकडे, या धावांचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सचा डावही गडगडला आहे. बेन डकेटला आपलं खातंही खोलता आलं नाही. तर थॉमस रॉजर्स आणि सॅम हार्पर एकेरी धाव करत तंबूत परतले. त्यामुळे सामना विजयाचं ग्लेन मॅक्सवेलवर दडपण आलं आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मेलबर्न स्टार्स (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, थॉमस फ्रेझर रॉजर्स, डॅनियल लॉरेन्स, मार्कस स्टॉइनिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, सॅम हार्पर (विकेटकीपर), हिल्टन कार्टराईट, उसामा मीर, मार्क स्टीकेटी, जोएल पॅरिस, पीटर सिडल.
ब्रिस्बेन हीट (प्लेइंग इलेव्हन): टॉम बँटन (विकेटकीपर), कॉलिन मुनरो (कर्णधार), नॅथन मॅकस्विनी, मॅट रेनशॉ, मॅक्स ब्रायंट, पॉल वॉल्टर, झेवियर बार्टलेट, विल प्रेस्टविज, स्पेन्सर जॉन्सन, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू कुहनेमन