सिडनी – ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश T20 लीग टुर्नामेंट सुरु आहे. या टुर्नामेंटमधील एका सामन्यावरुन मोठा वाद झालाय. होबार्ट हरीकेन्स टीमने ब्रिस्बेन हीट्सवर 2 रन्सनी विजय मिळवला. त्यावरुन हा सर्व वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेलाय की, आता या सामन्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले जात आहेत. होबार्ट हरीकेन्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 120 धावा केल्या. प्रत्युत्तरात ब्रिस्बेन हीट्सच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 118 धावा केल्या. या मॅचमध्ये ब्रिस्बेनच्या टीमला एकवेळ 23 बॉलमध्ये 18 रन्स करायच्या होत्या. पण ब्रिस्बेनच्या टीमला हे जमलं नाही.
म्हणून सुरु झाली फिक्सिंगची चर्चा
शेवटच्या ओव्हरवरुन या सर्व वादाची सुरुवात झाली. टिम डेविडला लास्ट ओव्हरमध्ये 10 धावांचा बचाव करायचा होता. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर सिक्स मारला. हा हाय फुलटॉस चेंडू होता. कमरेच्यावर चेंडू टाकल्याने नोबॉल दिला जाईल, असं सर्वांना वाटत होतं. पण अंपायरने हा चेंडू तपासला नाही. यानंतर फॅन्समध्ये बिग बॅश लीगमध्ये फिक्सिंग झाल्याची चर्चा सुरु झालीय.
ब्रिस्बेनची टीम जिंकणारी मॅच कशी हरली?
ब्रिस्बेन हीटची टीम सहजतेने हा सामना जिंकेल, असं वाटत होतं. पण शेवटच्या 23 चेंडूत मॅचच फिरली. होबार्टच्या टीमने शेवटच्या 4 ओव्हरमध्ये काय केलं? ते जाणून घ्या.
17 व्या ओव्हरमध्ये फहीम अश्रफने फक्त 2 रन्स दिल्या. यात त्याने एक विकेट घेतला.
18 व्या ओव्हरमध्ये नाथन एलिसने 4 रन्स दिल्या आणि एक विकेट घेतला.
19 व्या ओव्हरमध्ये जोएल पॅरिसने 2 रन्स देऊन एक विकेट घेतला.
The Hurricanes keep their season alive with an absolute miracle! #BBL12 pic.twitter.com/pCPBA7cp9x
— 7Cricket (@7Cricket) January 25, 2023
20 व्या ओव्हरमध्ये काय स्थिती होती?
होबार्टने लास्ट ओव्हरमध्ये पार्ट टाइम स्पिनर टिम डेविडच्या हाती चेंडू सोपवला. मागच्या तीन ओव्हर्समध्ये खराब प्रदर्शन करुनही ब्रिस्बेनची टीम जिंकणार असं मानल जातं होतं. टिम डेविडने पहिला डॉट बॉल टाकला. तिसऱ्या चेंडूवर विकेट गेला. चौथ्या चेंडूवर बॅज्लीने सिक्स मारुन मॅचची दिशा बदलली. शेवटच्या 2 चेंडूवर ब्रिस्बेनला 4 धावांची गरज होती. डेविडने पाचव्या बॉलवर रन्स दिला नाही. अखेरच्या चेंडूवर ब्रिस्बेनला चार धावांची गरज होती. पण बॅज्ली फक्त एक रन्स करु शकला.